Goa Beach Shack Dainik Gomantak
गोवा

Goa Shacks: शॅक्ससाठी पुन्हा अर्ज मागवण्याचा गोवा सरकारचा विचार

Goa Shacks: 11 ठिकाणी शॅक्ससाठी अर्जच आले नाहीत

दैनिक गोमन्तक

Goa Shacks: 11 ठिकाणी शॅक घालण्यासाठी कोणीच अर्ज न केल्याने तेथे पुन्हा परवाने देण्यासाठी पर्यटन खाते अर्ज मागवण्याचा विचार करत आहे. सध्या सोडतीद्वारे परवानाधारक निश्चित केल्यानंतर त्यांनी गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या माध्यमातून परवाना शुल्क अदा करणे सुरू केले आहे. ती प्रक्रीया पूर्ण केल्यानंतरच या नव्याने अर्ज मागवण्याचा विचार केला जाणार आहे.

यंदा 364 शॅक देण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. उत्तर गोव्यात 259 तर दक्षिण गोव्यात 105 शॅक परवाने निश्‍चित केले होते. मात्र अर्जाला प्रतिसाद म्हणून काढलेल्या सोडतीतून त्यापैकी उत्तर गोव्यात 255 तर दक्षिण गोव्यात 98 परवाने देण्यात येणार आहेत. त्यामुळे 11 ठिकाणी परवाने पहिल्या टप्प्यात दिले जाणार नाहीत. त्यासाठी पून्हा एकदा अर्ज मागवले जाऊ शकतात.

शॅकपैकी सर्वाधिक 108 शॅक हे कळंगुट येथे तर त्याखालोखाल बागा येथे 84 शॅक आहेत. एकतर पुन्हा अर्ज मागवणे किंवा परवाने न मिळालेल्या अर्जदारांना पून्हा या 11 ठिकाणच्या परवान्यांसाठी संधी द्यावी असे दोन पर्याय पर्यटन खात्यासमोर आहे. त्यातून योग्य तो पर्याय निवडण्याचा खाते प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa visit: भाजपच्या हालचालींना वेग; अमित शहा 7 सप्टेंबरला गोव्यात, बी. एल. संतोषही पुढील महिन्यात दौऱ्यावर

Sexual Assault Case: 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, खोर्ली-म्हापशात घृणास्पद कृत्य; स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या दिलं ताब्यात

Horoscope: रवि प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचा दुहेरी योग! 'या' राशींवर महादेवांची विशेष कृपा, यश-समृद्धीचे संकेत

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

SCROLL FOR NEXT