cm pramod sswant Dainik Gomantak
गोवा

Goa Government Employee Relief: गोवा मंत्रिमंडळाचा 'मास्टरस्ट्रोक'! सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांना मोठा दिलासा; पगार आणि निवृत्तीवेतनावर मिळणार अ‍ॅडव्हान्स रक्कम

Advance salary facility Goa: गोवा सरकारच्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोवा सरकारच्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत इंस्टापे सिनर्जीज प्रा. लि. या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यास मंजुरी देण्यात आली.

या कराराअंतर्गत सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांनी कमावलेल्या वेतनावर तसेच निवृत्तीवेतनावर आगाऊ रक्कम मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सरकारच्या मते, या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना खासगी सावकार किंवा जास्त व्याजदराच्या अल्पकालीन कर्जांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल. आर्थिक अडचणींच्या काळात त्वरित निधी उपलब्ध झाल्याने कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा आर्थिक ताणही कमी होण्यास मदत होईल.

दरम्यान, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अटी, अर्ज प्रक्रिया आणि आर्थिक मर्यादा यांबाबतचे सविस्तर नियम लवकरच जाहीर केले जाणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली.

आर्थिक अडचणींवेळी योजनेचा मोठा आधार

या उपक्रमामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना (Employees) महिनाअखेरीची वाट न पाहता त्यांनी काम केलेल्या कालावधीतील वेतनाचा काही भाग तातडीच्या गरजांसाठी आधीच घेता येणार आहे. तसेच निवृत्ती वेतनधारकांनाही त्यांच्या पेन्शनशी संबंधित आगाऊ आर्थिक सुविधा उपलब्ध होणार आहे. अचानक उदभवणारे वैद्यकीय खर्च, कौटुंबिक गरजा किंवा इतर तातडीच्या आर्थिक अडचणींच्या वेळी ही योजना मोठा आधार ठरणार असल्याचे सरकारचे मत आहे.

डिजिटल पद्धतीने अल्पावधीत मदत

ही योजना प्रभावीपणे आणि जलदगतीने राबवण्यासाठी स्वतंत्र संस्थेची नियुक्ती केली असून संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ आणि तांत्रिक पद्धतीने कार्यान्वित केली जाणार आहे. डिजिटल माध्यमातून अर्ज आणि मंजुरी प्रक्रिया पार पडणार असल्याने कर्मचाऱ्यांना कमी वेळेत आर्थिक मदत मिळू शकणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT