GST On Online Gaming, Casinos, Horse Racing  Dainik Gomantak
गोवा

ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो, हॉर्स रेसिंगवरील GST वाढणार? गोव्याचा विरोध, GoM बैठकीकडे लक्ष

ऑनलाइन गेमिंगवरील कर वाढीला गोवा सरकारने असहमती दर्शवली असून, त्यासाठी पर्याय देखील सुचवला आहे.

Pramod Yadav

GST On Online Gaming, Casinos, Horse Racing : ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर 28 टक्के जीएसटी लागू होऊ शकतो. GST कौन्सिलच्या मंत्रिगटाने (GoM) यावर 28 टक्के GST लावण्याचे मान्य केले आहे.

पण, ऑनलाइन गेमिंगवरील कराबाबत गोवा सरकारने असहमती दर्शवली असून, त्यासाठी पर्याय देखील सुचवला आहे.

जीएसटी कौन्सिलच्या 11 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत कर दरासह इतर काही गोष्टींवर विचार केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ग्रॉस गेमिंग रेव्हेन्यू (GGR) वर GST लावावा की प्लॅटफॉर्मद्वारे आकारले जाणारे शुल्क यावरही बैठकीत चर्चा होईल.

ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग किंवा कॅसिनो मध्ये खेळाडूंनी लावलेल्या संपूर्ण रकमेवर कर आकारला जावा का, यावरही कौन्सिल विचार करेल. अशी माहिती आहे. तसेच, हे तीन उपक्रम बेटिंग आणि जुगार श्रेणीत येतात की नाही हे देखील कौन्सिल ठरवणार आहे. अशी सूत्रांची माहिती आहे.

GST कौन्सिलच्या मंत्रिगटाने (GoM) यावर 28 टक्के GST लावण्याचे मान्य केले आहे. मात्र, गोव्याने त्याला असहमती दर्शवत त्यावर 18 टक्के जीएसटी आकारण्याची सूचना केली आहे.

जीएसटी कौन्सिल कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या डायन्युटक्सिमॅब या वैयक्तिकरित्या आयात केलेल्या औषधावर कर सूट देऊ शकते. सध्या अशा आयातीवर 5 किंवा 12 टक्के आयजीएसटी लागतो. औषधाची किंमत 36 लाख रुपये आहे त्यांना जीएसटीमधून सूट देण्यात यावी.असे फिटमेंट कमिटीने सुचवले आहे.

सिनेमा हॉलमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर 18 टक्के नव्हे तर 5 टक्के कर लावला जावा. असे ही फिटमेंट कमिटीने म्हटले आहे. नोंदणीचे नियम कठोर करून, नोंदणी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या पॅनशी जोडलेले बँक खाते तपशील सादर करण्याचा कालावधी 45 दिवसांवरून 30 दिवसांपर्यंत कमी केला जाऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT