Schools In Goa
Schools In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Schools: गोव्यात आता शाळा आणि मंदिरांच्या जवळही मिळणार दारु, राज्य सरकारचा निर्णय

Pramod Yadav

गोव्यात शाळा आणि धार्मिक स्थळांच्या शंभर मीटर अंतरात मद्यालये सुरु करण्यास परवानगी दिली जाणार आहे. याबाबत सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली असून, या निर्णयाला विरोध व्हायला देखील सुरुवात झाली आहे.

पर्यटनाला चालना देण्याच्या नावाखाली राज्य अबकारी खात्याने शाळा आणि धार्मिक स्थळांच्या शंभर मीटर अंतरात मद्यालये सुरु करण्यास परवानगी दिली जाणार आहे. पण, परवानेधारकांना यासाठी दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे.

यापूर्वी शाळा आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात मद्यालय सुरु करण्यास परवानागी दिली जात नव्हती. पण, अनेक पर्यटक मद्यालय नसलेल्या भागात भेट देण्याचे टाळतात. त्यामुळे राज्य सरकारकडून यापुढे मद्यालय सुरु करण्यास परवानगी देण्यात आलीय.

दरम्यान, यावरुन आता विरोध व्हायला लागला असून, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी शाळा आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात मद्यालय सुरु करण्यास दिलेली परवानागी तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: मुख्यमंत्र्यांनी घेतली मंत्री गंगापुरम किशन रेड्डी यांची भेट

Goa Congress: 'मॉडेल मडगाव पोर्टल' पालिकेचे अधिकृत पोर्टल आहे का? अमित पाटकर यांचा सवाल

Margao Theft: जाब विचारण्यासाठी आला आणि रोख रकमेची बॅग हिसकावून पळाला!

Goa Power Minister: नव्या मंत्रिमंडळानंतर वीजमंत्री ढवळीकरांची केंद्रीय ऊर्जामंत्र्यांशी पहिलीच भेट

Transport Minister Mavin Gudinho: क्षेत्रफळाच्या तुलनेत जास्त अपघात,अनेकजण मृत्युमुखी; रस्ते पाहणीसाठी तज्ज्ञ पाठवा

SCROLL FOR NEXT