Goa Govt on Salary Certificate:  Dainik Gomantak
गोवा

Goa Govt: कर्ज फेडण्याची क्षमता आहे? तरच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार सॅलरी सर्टिफिकेट

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आदेश जारी

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Govt on Salary Certificate: गोवा सरकारने आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवा आदेश जारी केला आहे.

त्यानुसार त्यांच्यात कर्ज फेडण्याची क्षमता असेल किंवा ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तरच त्यांना सॅलरी सर्टिफिकेट (वेतन प्रमाणपत्र) देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्यावतीने याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

या आदेशात म्हटले आहे की, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाच वेतन प्रमाणपत्र जारी करावे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापून जाणारी रक्कम वगळता त्याच्या हाती येणारी रक्कम ही कर्जफेड करण्यासाठी पुरेशी आहे की नाही, याची शहानिशा करूनच वेतन प्रमाणपत्र जारी करण्यात यावे.

संबंधित अधिकाऱ्यांनी सरकारी कर्मचारी कर्जफेडीसाठी सक्षम आहे की नाही याची खात्री करावी, असे सरकारचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT