Goa Congreess Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: ..आता बेरोजगारी, गुन्हेगारी, डोंगर कापणी, भ्रष्टाचार, जुगार यावर बोला! राज्यपालांना प्रदेश काँग्रेसचे उत्तर

Goa State Congress: राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केरळमध्ये गोव्यातील लोकसंख्येवर भाष्य केले होते

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केरळमध्ये गोव्यातील लोकसंख्येवर भाष्य केले. गेल्या १२ वर्षांत भाजपच्या सत्तेखाली वाढती बेरोजगारी, गुन्हेगारी, भू रुपांतरे आणि डोंगर कापणी तसेच वाढता भ्रष्टाचार, जुगार, कॅसिनो, वेश्याव्यवसाय आणि गोव्याच्या अस्मितेवर होणारा परिणाम यावरही राज्यपाल लवकरच बोलतील, अशी अपेक्षा प्रदेश काँग्रेसने व्यक्त केली आहे.

प्रदेश काँग्रेसने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या कक्षेत सरकारी कामकाज चालते का ते पाहण्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांचे कर्तव्य आहे. राज्यपालांनी बेकायदेशीर भू-रुपांतरण आणि डोंगर कापणीविरोधात कारवाई करावी, अशी काँग्रेसची इच्छा आहे. गोव्यात खून, बलात्कार, खंडणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यपालांनी सरकारकडून स्पष्टीकरण मागवावे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

हळदोणा येथील बेकायदेशीर जमीन रुपांतरणात सहभागी असलेल्या गोव्याच्या मुख्य सचिवांवर राज्यपालांकडून त्वरीत कारवाई होईल, अशी लोकांची इच्छा होती, पण तसे झाले नाही असेही काँग्रेसने निदर्शनास आणून दिले आहे.

आसगाव येथील घर जमीनदोस्त करण्याच्या प्रकरणात माजी पोलिस महासंचालकांना राज्यपाल कधी बोलले नाहीत. हणजुणे येथील रहिवासी बेकायदा संगीत वाजविण्यास विरोध करत असताना राज्यपालांनी गप्प बसणे पसंत केले. गोमंतकीयांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तरी राज्यपालांनी आपले मत मांडावे, अशी अपेक्षा काँग्रेसची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT