Tarballs Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील तेलगळती विरोधी योजना कुचकामी

टार बॉल्सचा परिणाम : दक्षिण गोव्यातील किनारे काळवंडले, स्थानिकांना मनस्ताप

दैनिक गोमन्तक

मडगाव : पावसाळ्याच्या तोंडावर गोव्यातील किनारे टार बॉलमुळे काळवंडण्याचा प्रकार यंदाही घडला आहे. दक्षिण गोव्यातील वास्को ते केळशी पर्यंतचे किनारे काळपट बनलेले असून त्यामुळे पर्यटक तिकडे जाण्याचे टाळत आहेत. (Goa government's anti-oil spill scheme ineffective)

किनारे काळवंडण्याच्या प्रकारांवर उपायांची कृती योजना असलेले गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे; पण तरीही गेली अनेक वर्षे ते या समस्येचा सामना करत आहे. या प्रकाराने स्थानिक रहिवासी अस्वस्थ झालेले असून सरकारकडे कारवाईची निदान किनारी भागाची पाहणी करण्याची मागणी करत आहेत.

यापूर्वी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी पहाणी केली होते त्यांचे निष्कर्ष व अहवाल प्रसिद्ध करण्याचीही त्यांची मागणी आहे.

जाणकारांचा असा दावा आहे की, आखातांतून तेल घेऊन आलेले टँकर व अन्य जहाजे समुद्रात धुऊन स्वच्छ केली जातात व त्यांतून बाहेर फेकला गेलेला कचरा व अन्य द्रव्यांचे मिळून हे टारबाॅल तयार होतात व लाटांबरोबर ते किनाऱ्यावर येऊन पडतात. पावसाळ्याच्या तोंडावर समुद्राच्या पोटात मोठ्या हालचाली होऊन तेथील कचरा व अन्य द्रव्ये वर येतात व त्यातूनही ते काळवंडतात.

कोरोना संकटातून पर्यटनक्षेत्र सावरत असताना तेलगोळे आगोंद तसेच खोला किनाऱ्यावर पसरल्यामुळे ओंगळवाणे स्वरुप प्राप्त झाले आहे.

आशिया खंडात दोनवेळा उत्कृष्ट समुद्रकिनारा म्हणून प्रथम क्रमांक बहाल केलेल्या या आगोंद किनाऱ्यावर कालपासून तेल तवंग पसरले आहे. पर्यटन हंगाम संपण्याच्या मार्गावर असलातरी आजही देशी पर्यटक काणकोण तालुक्यात प्रामुख्याने मौजमजा करण्यासाठी आणि समुद्रस्नानासाठी येत असतात. पण, सद्यःस्थितीत या ठिकाणी पसरलेल्या काळ्या तेल गोळ्यांमुळे पर्यटक परतीचा वाट धरत आहेत, असे व्यावसायिक गौरव भगत यांनी सांगितले. काही दिवसापूर्वी उत्तरेकडील भागात तेलतवंग पसरले होते.

हा प्रकार थांबवा : किनारा स्वच्छ ठेवण्याकरता पर्यटन खात्यातर्फे चार सफाई कामगारांची नियुक्ती केलेली आहे. हे कामगार किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचे काम करीत आहेत. समुद्रात काही जहाजे तसेच मोठ्या बोटी जलतरण करताना जळालेली ऑईल पाण्यात सोडतात. हीच ऑईल नंतर समुद्राच्या पाण्यातून किनाऱ्यावर येते. वाळू आणि तेल याचे मिश्रण होऊन तेल गोळे बनतात, हा प्रकार थांबायला हवा, असे मत माजी सरपंच व विद्यमान पंच सदस्य प्रमोद फळदेसाई यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT