rohan khaunte Dainik Gomantak
गोवा

Hinterland Tourism:'हिंटरलॅन्ड टुरिझम'चा आराखडा तयार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा राज्य सरकार 'हिंटरलॅन्ड टुरिझम'चा (Hinterland Tourism) आराखडा तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी योजना विकसित करण्याचे काम सुरू आहे. पर्यटन सर्किट निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून सल्लागाराची नियुक्त करण्यात आली आहे. अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांनी आज (दि.21) विधानसभेत दिली.

प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान खंवटे बोलत होते. खंवटे म्हणाले, एक - एक वैयक्तिक पर्यटनस्थळ विकसित करण्याऐवजी 'हिंटरलॅन्ड टुरिझम'चा आराखडा तयार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पर्यटनाचे सर्किट निर्माण झाल्यास पर्यटक त्या ठिकाणी काही दिवस व्यतित करेल या दृष्टिने विचार केला जात आहे. स्वदेश दर्शन (Swadesh darshan) अंतर्गत मायेम (Mayem) सुशोभीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात पीपीपी (PPP) पद्धतीने थीम पार्क (Theme Park) आणि इतर सुविधा विकसित केल्या जातील. असे खंवटे म्हणाले.

खवंटे यांनी त्यापूर्वी गोव्यात टॅक्सी सूविधेसाठी गोवा माइल्स (Goa Miles) प्रकारचे मॉडेल आवश्यक असून, अ‍ॅप आधारित टॅक्सी (App Based Taxi) महत्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT