पणजी: राज्यात भू-रूपांतर सुरूच आहे. आता ३२ भूखंडांच्या विभाग बदलास मान्यता देण्यात आली असून ३० दिवसांत अभिप्राय मागवला आहे.
नगररचना खात्याने नगररचना कायद्याच्या कलम ३९ अ अंतर्गत २.५६ लाख चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ३२ भूखंडांच्या विभाग बदलास मान्यता दिली आहे. प्रस्तावित विभाग बदलासाठी ३० दिवसांच्या आत हरकती आणि सूचना सादर करण्याचे आवाहन केले आहे. ३२ भूखंडांपैकी २१ भूखंड ५०० चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्रफळाचे आहेत.
यापैकी २५ भूखंड, ज्यांचे एकूण क्षेत्रफळ ५८ हजार ३४० चौरस मीटर आहे, त्यांचे विभाग बदल प्रादेशिक आराखडा २०२१ अंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. हे भूखंड मये, लाटंबार्से-पैंगीण, मोरजी, एला, कुंडई आणि उसगाव या गावांत आहेत. तसेच, कळंगुट-कांदोळी नियोजन क्षेत्राच्या २०१५ साठीच्या बाह्यविकास आराखड्याअंतर्गत कळंगुट, कांदोळी नियोजन क्षेत्रातील ७ भूखंड, ज्यांचे एकूण क्षेत्रफळ १ लाख ९८ हजार २६५ चौरस मीटर आहे, त्यांच्या विभाग बदलास मंजुरी देण्यात आली आहे. हे भूखंड कांदोळी, कोरगाव, रेवोडा, प्रियोळ आदी गावांमध्ये आहेत.
यात रामा गावकर यांच्या मये येथील २८ हजार ५००, रामचंद्र नाईक यांच्या लाटंबार्से येथील १२ हजार ५२५, रॉबर्ट फर्नांडिस व इतरांच्या मोरजी येथील २० हजार ३७५ , मे एनीग्मा प्रॉपर्टीजच्या एला येथील ४ हजार १०६ चौरस मीटर भूखंडाचा समावेश आहे.
त्याशिवाय स्मिता सावकर यांच्या कांदोळी येथील १ हजार ८५९, नटवरलाल गोहील यांच्या कोरगाव येथील १ लाख ६८ हजार ८००, उमेश कवठणकर यांच्या रेवोडा येथील १ हजर १७४, अनिलकुमार शर्मा यांच्या मुरगाव येथील २ हजार १०० तर मे. इनॉरबीट मॉल्सच्या पानेली येथील २३ हजार ४९७ चौरस मीटर भूखंडाचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.