Goan Youth killed in America Dainik Gomantak
गोवा

चांदरमधील तरुणाचं पार्थिव गोव्यात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु

गोव्यातील एनआरआय आयुक्त अमेरिकेतील दुतावासाच्या संपर्कात, प्रमोद सावंतांची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : चांदरमधील तरुणाची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या तरुणाचं पार्थिव गोव्यात परत आणण्यासाठी गोवा सरकार अमेरिकेतील दुतावासाच्या संपर्कात असल्याचं काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी स्पष्ट केलं आहे. 25 वर्षीय गोमंतकीय तरुणाला चोराने केलेल्या गोळीबारात अमेरिकेमध्ये जीव गमावावा लागला होता.

प्रमोद सावंत यांनी ट्विट करत गोव्यातील एनआरआय आयुक्तांचं कार्यालय सातत्याने अमेरिकेतील (America) दुतावासाशी संपर्कात असल्याचं सांगितलं आहे. चांदरमधील 25 वर्षीय तरुण जॉन डायस याचं पार्थिव परत गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून ते गोव्यात असलेल्या कुटुंबाकडे दिले जाणार आहेत, ज्यामुळे ते जॉनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करु शकतील. तसंच गोमंतकीय तरुणाच्या हत्येबाबत दु:खही व्यक्त केलं आहे. आपण या कठीण प्रसंगी डायस कुटुंबासोबत असल्याचंही प्रमोद सावंत म्हणाले आहेत.

जॉन हा एक चांगला फुटबॉलपटू होता. दक्षिण गोव्यातील (South Goa) चांदर आणि गिरदोली येथील क्लबसाठी तो पूर्वी गोलकिपिंग करायचा. मात्र रोजगाराच्या शोधात तो तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत गेला होता. स्टोअरमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या एका बुरखाधारी व्यक्तीने जॉनवर गोळी (Attack) झाडली. गोळीबाराच्या घटनेनंतर लगेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाला होता. पोलिसांकडून (Police) हल्लेखोराचा तपास सुरू करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT