Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

एसजीपीडीए सोपो कंत्राट वाटपाची सरकार चौकशी सुरू करणार : राणे

योग्य निविदा प्रक्रियेशिवाय एसजीपीडीए सोपो कंत्राट वाटप केल्याप्रकरणी सरकार चौकशी सुरू करेल, असे मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

गोवा: योग्य निविदा प्रक्रियेशिवाय एसजीपीडीए सोपो कंत्राट वाटप केल्याप्रकरणी सरकार चौकशी सुरू करेल, असे मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. ते म्हणाले की “माझ्या निदर्शनास आले आहे की, सोपो कंत्राट मडगाव येथील एसजीपीडीएला निविदा आणि योग्य प्रक्रियेशिवाय देण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी विभागाकडून करण्यात येणार असून सदस्य सचिव व इतरांवर कडक कारवाई करण्यात येईल.

(Goa Government to initiate enquiry in SGPDA sopo contract allocation)

ते पुढे म्हणाले की माझ्या समजुतीनुसार, सोपोच्या निविदा काढण्यासाठी उच्च न्यायालयाचा आदेश आहे आणि सदस्य सचिवांनी केलेली कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारी आहे. या प्रकरणाची चौकशी विभागाकडून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सोपो कर गोळा करण्यासाठी कामगार नेमणुकीसाठी काढलेली वर्क ऑर्डर रद्द केलेली आहे. नगरनियोजन मंत्र्यांच्या कारवाईच्या इशार्‍यानंतर सदस्य सचिव विनोदकुमार यांच्याकडून काम रद्द करण्याचा आदेश जारी करण्यात आलेला आहे.

काय आहे प्रकरण

मडगाव पालिकेने सोपो ठेकेदाराला दिलेली 32 लाखांची सवलत बेकायदेशीर असल्याचा दावा करून शॅडो कौन्सिलने त्या प्रकरणात पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून केला आहे. सार्वजनिक तिजोरीवर डल्ला असल्याने या प्रकरणात पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.साव्हियो कुतिन्हो यांनी त्यांना माहिती हक्क कायद्याखाली मिळालेल्या माहितीच्या आधारावर मागणी करताना सदर ठेकेदार हा पालिकेचा थकबाकीदार असताना त्याला अशी सवलत कशी दिली जाऊ शकते, असा मुद्दाही उपस्थित केला आहे.

त्यांच्या दाव्याप्रमाणे असे असताना त्याला केवळ बत्तीस लाखांची सवलतच दिली गेली नाही तर नाममात्र पाच टक्के वाढ करून ठेका मुदतवाढ दिली गेली. नियमानुसार ही वाढ पंचवीस टक्के हवी व म्हणून संगनमताने पालिकेच्या तिजोरीवर टाकलेला तो डल्ला ठरतो, अशी टीका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT