The House of Abhinandan Lodha Advertise Dainik Gomantak
गोवा

Goa Real Estate Ad Controversy: '...आता गोवा ताब्यात घ्या' अशी वादग्रस्त जाहिरात देणाऱ्यांना गृहखात्याचा दणका

Controversial Advertisement: दिल्लीचे देशावर राज्य आहे, आता गोवा ताब्यात घ्या, असे म्हणणारी जाहिरात हटवण्यासाठी गृह खात्याने पत्र लिहिले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Real Estate Ad Controversy

पणजी: दिल्लीचे देशावर राज्य आहे, आता गोवा ताब्यात घ्या, असे म्हणणारी जाहिरात हटवण्यासाठी गृह खात्याने द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांना पत्र लिहिले आहे. गृह खात्याचे अवर सचिव मनेश हरी केदार यांनी हे आज पाठवले आहे.

गृह खात्याला तशी सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आली होती. लेखी सूचनेत मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले होते, की ही जाहिरात अत्यंत आक्षेपार्ह आहे. पोर्तुगीजांची ४५० वर्षांची सत्ता केवळ ३६ तासांत संपुष्टात आली.

पोर्तुगिजांनी भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करली. त्यामुळे गोवा ताब्यात घेण्याची जाहिरातीत वापरलेली भाषा ही मुक्त गोव्यातील नागरिकांच्या भावना दुखावणारी आहे. यामुळे अशी आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्यांना समज देण्यात यावी आणि जाहिरात हटवण्याची सक्त सूचना केली जावी.

त्यानंतर गृह खात्याकडून हे पत्र आज जाहिरातदारांना पाठवण्यात आले आहे. होर्डिंग्जवरील या जाहिरातीचा उल्लेख विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही करण्यात आला होता. विकासक व बांधकाम व्यावसायिकांची मजल कुठवर गेली आहे, हे दर्शवण्यासाठी विरोधकांकडून या जाहिरातीचा वापर करण्यात आला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या जाहिरातीविरोधात कारवाई करण्याचे, ती जाहिरात हटवण्याचे आदेश सरकार देईल, असे आश्वासन विधानसभेत दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून लेखी सूचना पाठवून गृह खात्याला कारवाई करण्यास सांगण्यात आले होते.

सक्त कारवाईची तंबी!

गृह खात्याने त्या आधारे हे पत्र पाठवले आहे. त्यात ही जाहिरात तत्काळ हटवण्याची सक्त सूचना करण्यात आली आहे. जाहिरात हटवल्याचा अहवाल गृह खात्याला सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. त्याचे पालन न केल्यास सक्त कायदेशीर कारवाई केली जाईल, अशीही तंबी पत्रातून देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT