Goa Government Dainik Gomantak
गोवा

Goa Government: 'LED' वापराविरोधी कारवाईसाठी 56 कर्मचाऱ्यांची नेमणूक

Goa Government: खोल समुद्रात एलईडीचा वापर करुन मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठीच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: खोल समुद्रात एलईडीचा वापर करून मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी मनुष्यबळाची कमतरता असून 56 कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली आहे. ही नेमणूक झाल्यानंतर कठोर कारवाईला सुरुवात केली जाईल अशी माहिती आज ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली. या जनहित याचिकेवरील सुनावणी खंडपीठाने दिवाळीच्या सुट्टीनंतर ठेवली आहे.

एलईडीचा वापर करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली असताना अनेक मच्छिमारी ट्रॉलर्स तसेच बुल ट्रोलिंग जहाजे खोल समुद्रात जाऊन या एलईडीचा वापर करत असल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मासेमारी खाते तसेच तटरक्षक दलाला कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच्या आधारे मासेमारी खाते सक्रिय झाले आहे.

खात्याकडे तक्रार नाही

तक्रारी किनारपट्टी पोलिसांनी मच्छिमारी खात्याकडे सोपविल्या आहेत, तरी कोणतीच कारवाई होत नाही असे आहे का असे विचारले असता ते म्हणाले की तशा काही तक्रारी खात्याकडे आलेल्या नाहीत. वृत्तपत्रातूनच ते उघडकीस आणण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT