Goa school teacher Dainik Gomantak
गोवा

Goa Education: सरकारी शाळांत 380 शिक्षकांची पदे रिक्त, 'त्‍या' निर्णयामुळे शिक्षक भासणार कमी

Goa school teacher: राज्‍यातील सरकारी शाळांमध्‍ये अजूनही सुमारे ३८० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. गेल्‍या काही वर्षांत रिक्तपदांमधील १४३ पदे भरण्‍यात आली आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्‍यातील सरकारी शाळांमध्‍ये अजूनही सुमारे ३८० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. गेल्‍या काही वर्षांत रिक्तपदांमधील १४३ पदे भरण्‍यात आली आहेत. यंदा सहा वर्षांच्‍या मुलांनाच पहिलीत प्रवेश देण्‍याच्‍या सरकारच्‍या निर्णयामुळे चार ते साडेचार हजार विद्यार्थी कमी होतील. त्‍यामुळे यंदा शिक्षकांची संख्‍या कमी भासणार असल्‍याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

सरकारी शाळांमध्‍ये आवश्‍‍यक तितक्‍या शिक्षकांची पदे भरण्‍याची प्रक्रिया सरकारने गेल्‍या काही वर्षांपासून सुरू केलेली आहे. त्‍यानुसार शिक्षण खात्‍याने या प्रक्रियेला गती देत रिक्त पदांमधील १४३ पदे भरलेली आहेत. याशिवाय सध्‍या रिक्त असलेल्‍या पदांपैकी काही पदे भरण्‍यासाठी कर्मचारी भरती आयोगाला प्रस्‍तावही सादर केलेला आहे.

यंदा सरकारने वयाची सहा वर्षे पूर्ण केलेल्‍या मुलांनाच इयत्ता पहिलीच्‍या वर्गात प्रवेश देण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे सुमारे चार ते साडेचार हजार विद्यार्थी कमी होणार असल्‍याने प्राथमिक शाळांमध्‍ये शिक्षकांची संख्‍या कमी भासेल. परंतु, खात्‍याकडून प्रक्रिया सुरूच राहणार असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT