Goa government revenue growth Dainik Gomantak
गोवा

Goa Economic Survey Report: गतवर्षी किती महसूलवाढ झाली? आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; केंद्रीय योजनांच्‍या लाभार्थींमध्‍ये वाढ

Goa government revenue growth: २०२४-२५ मधील अर्थसंकल्‍पात राज्य सरकारने महसुलासाठी जी तरतूद केली होती, त्‍यातून राज्‍याला २,४०३.७२ कोटींचा लाभ मिळाला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: २०२४-२५ मधील अर्थसंकल्‍पात राज्य सरकारने महसुलासाठी जी तरतूद केली होती, त्‍यातून राज्‍याला २,४०३.७२ कोटींचा लाभ मिळाला. ही वाढ ६.६८ टक्‍के इतकी असल्‍याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद केले आहे.

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा सर्वेक्षण अहवाल सभागृहात सादर केला. मुख्यमंत्री म्हणाले, की प्रधानमंत्री जन धन, प्रधानमंत्री जीवनज्‍योती, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा, अटल पेन्‍शन, प्रधानमंत्री मुद्रा आदींसारख्‍या केंद्रीय योजनांच्‍या राज्‍यातील लाभार्थींमध्‍ये वाढ झाली आहे.

राज्‍याचा सर्वांगीण विकास साधण्‍यासाठी सुरू केलेल्‍या ‘आत्‍मनिर्भर भारत-स्‍वयंपूर्ण गोवा’ योजनेअंतर्गत विविध सरकारी खात्‍यांनी घेतलेल्‍या शिबिरांचा ७१,८१५ जणांनी लाभ घेतला असून, त्‍याचा फायदा त्‍यांना मिळाला आहे. सामूहिक शेतीला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी पाच वर्षांत ४७९ जणांना ३.३४ कोटींचे साहाय्‍य केले आहे. तर शेतकरी आधार निधीच्‍या माध्‍यमातून १२,६६४ जणांना १७.२७ कोटी रुपये वितरित केले, असेही अहवालात म्‍हटले आहे.

‘मोपा’कडून ११४.४९ कोटींचा महसूल

२०२३ मध्‍ये ‘पीपीपी’ तत्त्‍वावर सुरू झालेल्‍या मोपा येथील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळाकडून राज्‍य सरकारला डिसेंबर २०२५ पर्यंत ११४.४९ कोटींचा निधी मिळाला आहे. मोपा आणि दाबोळी विमानतळावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांत २०२४-२५ च्‍या तुलनेत २०२५-२६ मध्‍ये वाढ झाली. गतवर्षी गोव्‍याला सुमारे २.३५ लाख आंतरराष्‍ट्रीय पर्यटकांनी भेट दिल्‍याचे अहवालात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT