Goa Eco Sensitive Area Dainik Gomantak
गोवा

Goa Eco Sensitive Zone: गोवा सरकारला मोठा धक्का! जैवसंवेदनशील 22 गावे वगळण्याच्या प्रयत्नांना खो; केंद्राला हवी आणखी माहिती

Goa Eco Sensitive Area: केंद्र सरकारने ३१ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार, गोव्यातील १०८ गावे पश्‍चिम घाट जैवसंवेदनशील क्षेत्रात येतात असे नमूद करण्यात आले होते.

Sameer Panditrao

पणजी: गोवा सरकारने पश्‍चिम घाट जैवसंवेदनशील विभागातून वगळण्याचा प्रस्ताव सादर केलेल्या २२ गावांबाबत केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामानबदल मंत्रालयाने अधिक स्पष्ट व सखोल माहितीची मागणी केली आहे. त्‍यामुळे राज्य सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

केंद्र सरकारने ३१ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार, गोव्यातील १०८ गावे पश्‍चिम घाट जैवसंवेदनशील क्षेत्रात येतात असे नमूद करण्यात आले होते. या अधिसूचनेला आक्षेप घेत गोवा सरकारने २२ गावे या क्षेत्रातून वगळावीत, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती.

या मागणीस वैधतेची पृष्ठभूमी देण्यासाठी राज्य सरकारने भारतीय वन सर्वेक्षण संस्थेचे माजी महासंचालक डॉ. देवेंद्र पांडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशींचा आधार घेत सरकारने २२ गावे वगळण्याचा आग्रह धरला होता.

मात्र आता केंद्र सरकारने १०८ गावांची तपशीलवार माहिती, गावनिहाय वनक्षेत्र नसलेले क्षेत्रफळ, नोंदणीकृत/खासगी वनक्षेत्र, तसेच वन/झाडांचे क्षेत्रफळ अशी सविस्तर माहिती मागविली आहे. सध्या ही माहिती गोवा सरकारकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारची भूमिका ठरणार महत्त्‍वपूर्ण

राज्य शासनाच्या धोरणाला पर्यावरणप्रेमी गटांकडून आधीपासूनच विरोध होत आहे. आता केंद्राच्या तांत्रिक आढाव्यानंतर हा मुद्दा अधिक संवेदनशील बनला आहे. पश्‍चिम घाट जैवसंवेदनशील समितीचे निमंत्रक डॉ. एस. केरीकेट्टा यांनी हे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे. केरीकेट्टा हे राज्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यामुळे सरकार किती लवकर देऊ शकेल यावरच बरेच काही अवलंबून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: क्रीडा आणि संस्कृती मंत्र्याविना होणार पावसाळी अधिवेशन; गोवा मंत्रिमंडळात अधिवेशनानंतर फेरबदल

IND Vs ENG: जडेजाच्या 'त्या' निर्णयामुळे भारत हरला? अनिल कुंबळे म्हणतात...

इंग्लंडमध्ये '1947' च्या आठवणी ताज्या, राजीव शुक्लांनी किंग चार्ल्सना दिले 'स्कार्स ऑफ 1947' पुस्तक भेट!

Viral Video: दुधसागर धबधब्याचा नयनरम्य व्हिडिओ व्हायरल, निसर्गाची किमया पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Digital India Reel Contest: 'रील' बनवायला आवडतंय? दाखवा तुमचं टॅलेंट आणि जिंका 15,000 रुपये, केंद्र सरकारचा भन्नाट उपक्रम वाचा

SCROLL FOR NEXT