Haltara Dam Near Kalsa Bhandura Karnataka  Dainik Gomantak
गोवा

Goa Karnataka Conflict : गोवा आता कर्नाटकला न्यायालयात खेचणार

कर्नाटकने आता हलतरा नाल्यावर पाणी वळविण्यासाठी पोल घालून आखणी (मार्किंग) सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Karnataka Conflict : म्हादई पाणी वाटपावरून कर्नाटक आणि गोवा राज्यात न्यायालयीन वाद सुरू असतानाच कर्नाटकने आता हलतरा नाल्यावर पाणी वळविण्यासाठी पोल घालून आखणी (मार्किंग) सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब सर्वोच्च न्यायालयाबरोबर म्हादई जलतंटा लवादासमोर मांडणार असल्याची माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

मंत्री शिरोडकर म्हणाले, या प्रश्‍नी सरकार गंभीर आहे. म्हादई खोऱ्यातील पाणीवाटप सर्वोच्च न्यायालयात आणि म्हादई पाणीवाटप तंटा लवादाकडे आहे. याविषयीच्या अधिकच्या संशोधनासाठी लवादाला आणखी एक वर्षाची मुदत दिली आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी येण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2014 मध्ये कर्नाटकने या प्रकरणाचा संपूर्ण निकाल येण्यापूर्वी पाण्याचा वापर करणार नाही आणि पाणी वळवणार नाही, असे स्पष्ट केले होते.

म्हादईवर कर्नाटक सरकारचे अहंकारी वर्चस्व सुरू आहे. गोवा सरकार मात्र त्याकडे वेगळ्याच अर्थाने पाहात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत ठाम राहून कर्नाटकला म्हादई नदीवरील बंधारा बांधण्यापासून रोखावे, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT