Goa Government | Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Government: माध्यान्ह आहारात स्वयंसहाय्य गटांना वाढीव दर- प्रमोद सावंत

Goa Government: दर्जाबाबत तडजोड सहन करणार नाही, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: स्वयंसहाय्य गटांकडून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहाराबाबतचे दर वाढवले जातील. मात्र, दर्जाबाबत तडजोड सहन करणार नाही, अशी तंबी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

राज्यात मुलांना स्वयंसहाय्य गटांमार्फत माध्यान्ह आहार पुरवला जातो. यासाठीची दिली जाणारी रक्कम वाढवावी अशी मागणी करत आहार पुरवठा बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. यावर मुख्यमंत्री म्हणाले, स्वयंसहाय्य गटांना पैसे देण्यासाठी अडचण नाही. आपण पैसे वाढवतो.

मात्र, आहाराच्या दर्जाबाबत तडजोड नको. स्वयंसहाय्य गटांमार्फत दिल्या जाणाऱ्या आहारांपैकी 50 टक्के मुले हा आहार खात नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे आहारात बदल करून पावाऐवजी चपाती देण्यात यावी आणि भाजीचा दर्जा वाढवावा, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिविद्यार्थी 1.90 पैसे देणार अतिरिक्त

योजनेच्या प्रारंभी प्रतिविद्यार्थी 2 रुपये 50 पैसे दिले जात होते. कोरोनानंतर पाचवीपर्यंत 6 रुपये 11 पैसे व आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 7 रुपये 45 पैसे दिले जातात. मात्र, स्वयंसहाय्य गटांनी पाचवीपर्यंत 8 रुपये तर आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 10 रुपयांची मागणी होती. यावर सरकारने प्रतिविद्यार्थी 1 रुपये 90 पैशांची वाढ केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT