Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Water Flow Meter: 'मतांसाठी मोफत पाणी देणार नाही'! गोव्यात वॉटर फ्लो मीटर’चा होणार वापर; पाणी चोरी, गळतीवर येणार नियंत्रण

Subhash Phaldesai: पाण्याच्या टाक्यांना ‘वॉटर फ्लो मीटर’ बसविण्याचा विचार सुरू असून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

Sameer Panditrao

पणजी: मतांसाठी मोफत पाणी देण्याच्‍या बाजूने आमचे सरकार नाही. पाण्‍याची चोरी, जुन्या जलवाहिन्‍या आणि सदोष मीटरमुळे सरकार पाण्यावरील ४०% महसूल गमावत आहे. त्‍यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याच्या टाक्यांना ‘वॉटर फ्लो मीटर’ बसविण्याचा विचार सुरू असून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

सोमवारी एका वाहिनीशी बोलताना ते म्‍हणाले, ‘पिण्याचे पाणी गळतीमुळे व चोरीमुळे मोठ्या प्रमाणात वाया जाते. त्यामुळे प्रत्यक्ष तयार होणारे व नागरिकांपर्यंत पोहोचणारे पाणी यात मोठी तफावत निर्माण होतो. त्यामुळे प्रथम पाण्याची गळती व चोरी रोखणे आवश्यक आहे. त्यासाठीच टाक्यांवर ‘वॉटर फ्लो मीटर’ बसविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

भूमिगत जलवाहिन्या गळतात आणि पाणी फुकट जाते. शिवाय पाण्याचा मीटर बाजूला ठेऊन काही थेट पाणी जोडण्या घेतल्या आहेत. त्याचा महसूल मिळत नाही. काही जण घरगुती पाणी जोड घेऊन त्याचा वापर औद्योगिक कारणासाठी करतात. अनेक ठिकाणचे पाण्याचे मीटर चालतच नाहीत. या साऱ्या समस्या दूर करून पाण्याची उपलब्धता वाढवता येणार आहे. वाढत्या

लोकसंख्येला व पर्यटन व्यवसायाला लक्षात घेऊन आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवणे ही सरकारसमोरील जबाबदारी आहे, असेही फळदेसाई म्‍हणाले.

माझ्याही मतदारसंघात खोदकामाचा त्रास

मंत्री सुभाष फळदेसाई म्‍हणाले, आम्ही कंत्राटदाराच्या मर्जीने रस्ते खोदकाम करू शकत नाही. वीज विभागाच्या रस्ते खोदकामांमुळे मलाही माझ्या मतदारसंघात त्रास सहन करावा लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK vs SL: पाकिस्तानची पुन्हा लाज गेली! 6 चेंडूत 10 धावा जमल्या नाही, श्रीलंकेसमोर टेकले गुडघे Watch Video

Cash For Job: नोकरीसाठी पैसा दिला, तरी ‘इतका आला कुठून?’ असे विचारत ED मागे लागते; पैसे देऊन अवलक्षण

अग्रलेख: गोव्यात 'दरोडा' घालायचा विचार जरी मनात आला, तरी कापरे भरेल अशी जरब व भीती बसणे शक्य आहे..

IFFI 2025: 'जागतिक सिनेमा गोव्‍यात अनुभवता यावा, हेच आमचे प्रथम लक्ष्‍य’! NFDCचे तांत्रिक विभागप्रमुख यादव यांचे स्पष्टीकरण

Illegal Fishing: भाजप आमदाराच्या मालकीचा ट्रॉलर जप्त? महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी! अधिकाऱ्यांकडून मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT