CleanAThon Goa Dainik Gomantak
गोवा

CleanAThon Goa: इफ्फीच्या समारोपाला मिरामार येथे क्लिन-ए-थॉन, दिग्गज अभिनेते राहणार उपस्थित

गोवा सरकारचे क्लिन-ए-थॉन; जॅकी श्राफ, रेमो डिसुजा, अमृता फडणवीस राहणार उपस्थित

Pramod Yadav

गोवा सरकार, भामला फाऊंडेशन आणि द्वियाज फाऊंडेशन यांच्यावतीने गोव्यात क्लिन-ए-थॉन आयोजित करण्यात आले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्यासह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) उपस्थित राहणार आहेत. यासह सिनेसृष्टीतील दिग्गज देखील उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे याच दिवशी इफ्फीचा अखेरचा दिवस असून, इफ्फीचा समारोप होणार आहे.

पणजीतील मिरामार बिचवरती क्लिन-ए-थॉन स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. किनारपट्टी स्वच्छता मोहिमेचा हा एक भाग आहे. सोमवारी (दि.28) सकाळी आठ वाजता मिरामार बिचवरती या स्वच्छता मोहिमेला सुरूवात होणार आहे. यासाठी बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff), दिग्दर्शक आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुजा (Remo D'souza) तसेच, अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा देखील अखेरचा दिवस आहे.

याबाबत अभिनेते जॅकी श्रॉफ या अभियानात सहभागी होणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच, रेमो डिसुजा यांनी देखील क्लिन-ए-थॉनसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील नागरिकांना या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे अवाहन केले आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृकता निर्माण करणे, कचरा व्यवस्थापनाबाबत माहिती देणे आवश्यक आहे. तसेच, गोव्याच्या पर्यटनासाठी गोवा किनारपट्टी स्वच्छ ठेवणे महत्वाचे असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT