Farm  Dainik Gomantak
गोवा

Goa Government: 'खाजन' सांतआंद्रेतीलच नव्हे, तर राज्यातील एक प्रमुख विषय असल्याने जमीन पुनरुज्जीवित करणार

Goa: सांतआंद्रेतील खाजन शेती जमीन पाण्याखाली गेली असून ती पुनरुज्जीवित करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: सांतआंद्रेतील खाजन शेती जमीन पाण्याखाली गेली असून ती पुनरुज्जीवित करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी बांधाला पडलेल्या भेगा दुरुस्त करण्यात आल्या. त्यामुळे आजोशी, नेवरा खाजन येथे काही भागात शेती केली जाते. परंतु मोठी कामे सुरू करण्यासाठी जलस्रोत खाते आणि भू संवर्धन खात्याकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही.

दरम्यान, त्यामुळे केंद्र सरकारकडे निधीसाठी विनंती केली आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर काम सुरू केले जाणार आहे, असे आश्‍वासन सरकारने दिले आहे, अशी माहिती आमदार वीरेश बोरकर यांनी दिली. ‘खाजन’ सांतआंद्रेतीलच नव्हे, तर राज्यातील एक प्रमुख विषय आहे. सध्या शेती जमीन नावावर करण्याची मोहीम सुरू केली आहे, कारण शेती जमीन नावावर नसल्याने टेनंट संघटनेच्या मतदानाचा हक्क शेतकऱ्यांना मिळत नाही.

तसेच, यासंदर्भात कायदा दुरुस्ती करण्याची मागणी विधानसभेत करणार आहे. तसेच 3 ए अर्ज देखील पूर्ण केले नसल्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर शेती जमीन दाखवत नाही. या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे बोरकर यांनी स्पष्ट केले.

जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांना सांतआंद्रेतील पाण्याखाली बुडलेली खाजन शेती जमीन दाखवली आहे. तसेच बांधाला पडलेल्या भेगा देखील त्यांच्या नजरेस आणून दिले आहे. सध्या आजोशी येथील सेंट मॅथ्यू टेनंट संघटनेच्या अखत्यारीत येणाऱ्या बांधाचे 15 लाख रुपयांचे दुरुस्ती काम सुरू केले आहे. छोटी कामे हाती घेऊन किमान थोडी जमीन पुन्हा शेतीसाठी उपलब्ध करून देण्याचे निश्‍चित झाले आहे, असे बोरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

Donald Trump: अमेरिकेत नवा वाद! जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन यांच्या पंक्तीत आता डोनाल्ड ट्रम्प; 'त्या' फोटोनं जगाला चक्रावलं

SCROLL FOR NEXT