Sanjivani Sugar Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory : सरकारने आम्हाला योग्य न्याय द्यावा; संजीवनी’चे कंत्राटी कामगारांचा रोजगार धोक्‍यात

कराराचे नूतनीकरण रोखले; २०-२२ वर्षे बजावलीय सेवा

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda : संजीवनी सहकारी साखर कारखान्यात गेल्‍या २२ वर्षांपासून कंत्राट पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येत असल्याने त्‍यांच्‍यात असंतोष पसरला आहे.कर्मचारी बाबू गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेली २० ते २२ वर्षे आम्‍ही कंत्राट पद्धतीवर संजीवनी साखर कारखान्‍यात कामाला होता.

दरवर्षी आमच्‍या कंत्राटी कराराचे नूतनीकरण व्‍हायचे. पण यंदा गेल्या महिन्यात संपलेल्‍या कराराचे अजून नूतनीकरण करण्‍यात आलेले नाही. आम्हाला कामावरून कमी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. आम्ही ८० कामगार आहोत. आता आमचे वय झाल्याने सरकारी नोकरी आम्हाला मिळणार नाही. आम्‍ही खायचे काय?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कृषीमंत्री रवी नाईक, स्थानिक आमदार डॉ. गणेश गावकर यांची भेट घेऊन आम्‍ही आमच्‍या समस्‍या मांडल्या आहेत. दोन महिन्यांचा पगार अजून मिळालेला नाही. सरकारने आम्हाला योग्य न्याय द्यावा.

बाबू गवळी, कामगार

कंत्राटी कामगारांचा दोन महिन्यांचा राहिलेला पगार त्‍यांना दिला जाईल. त्यांचे कंत्राट जून महिन्यात संपले आहे. जोपर्यंत सरकारकडून आम्हाला ‘त्यांना कामावर घ्या’ असे लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत त्यांना कामावर घेणे शक्य नाही.

सत्तेज कामत, ‘संजीवनी’चे प्रशासक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT