dhs goa recruitment  Dainik Gomantak
गोवा

Government Job: लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि गोंधळ! 100 पदांसाठी हजारोंची गर्दी, तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत

DHS campal recruitment crowd: राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या केवळ १०० कंत्राटी नर्सिंग पदांसाठी कंपालमधील आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयाबाहेर हजारोंच्या संख्येने उमेदवारांची गर्दी

Akshata Chhatre

पणजी: राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या केवळ १०० कंत्राटी परिचारिका (नर्सिंग) पदांसाठी सोमवारी (दि.४) कंपालमधील आरोग्य सेवा संचालनालय (DHS) कार्यालयाबाहेर हजारोंच्या संख्येने उमेदवारांची गर्दी उसळली. ही गर्दी इतकी प्रचंड होती की, परिसरात लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या दृश्याने 'पदवी मिळवली, पण पोटाची खळगी भरायला अजून संघर्ष सुरूच आहे!' या विदारक वास्तवावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.

राज्यात बेरोजगारीची स्थिती किती गंभीर आहे, याचे हे फक्त एक उदाहरण आहे. गोवा रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी झालेल्या एकूण ५६,२७६ उमेदवारांपैकी बहुसंख्य पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तरुण आहेत. हे आकडे केवळ चिंतेचे कारण नसून, राज्याच्या शिक्षण आणि रोजगार धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत.

आकडेवारीनुसार, २५ वर्षांपर्यंतच्या वयोगटात मोठ्या प्रमाणात तरुणांनी नोंदणी केली आहे. यात बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. यांसारख्या पदवीधारकांची संख्या सर्वाधिक आहे. केवळ बी.कॉम. पदवीधरांची संख्या ३,४७९ इतकी आहे, तर इंजिनिअरिंगची पदवी घेऊनही ८५९ तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.

याहून गंभीर परिस्थिती २६ ते ३५ वयोगटात दिसून येते. या वयोगटातील १०,७६१ बी.कॉम. धारक आणि ४,२०७ इंजिनिअर्स नोकरीच्या शोधात आहेत. याशिवाय, एम.ए., एम.एस्सी., एम.कॉम., फार्मसी, वकील, डॉक्टर अशा उच्च शिक्षण घेतलेल्या हजारो युवकांनीही सरकारी नोकरीच्या आशेने रोजगारासाठी नोंदणी केली आहे. हे चित्र गोव्याच्या तरुणाईपुढील मोठ्या आव्हानाकडे निर्देश करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT