Goa Government Job Dainik Gomantak
गोवा

Goa Government Job: गोमंतकीय तरुणाच्या पदरी निराशा; सरकारने मार्चपर्यंत नोकरभरती केली स्थगित

Job Creation Halt in Goa: वित्त खात्याचे अतिरिक्त सचिव प्रणव भट यांच्या सहीने सदर परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

Pramod Yadav

पणजी: आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत बजेट तरतुदींतील २० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम खर्च करू नये, नोकरीची नवीन पदे निर्माण करू नये, असे सरकारने निर्देश जारी केले आहेत.

वित्त खात्याचे अतिरिक्त सचिव प्रणव भट यांच्या सहीने सदर परिपत्रक जारी करण्यात आले आहे. सरकारच्या वतीने खर्च कपातीवर भर देण्यात येत आहे. फर्निचर, संगणक, झेरॉक्स मशीन, एसी, कार खरेदीवर ३१ मार्चपर्यंत निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

हल्लीच मुख्यमंत्री सावंत यांनी सर्व खात्यांचा वित्तीय आढावा घेतला होता. त्यानंतर निर्देश जारी करण्यात आले आहेत. सरकारी पदे निर्मिती थांबणार असल्याने तरुण मात्र नाराज होणार आहेत. नोकर भरती आयोगाकडून सर्व खात्यांकडून रिक्त जागांची माहिती घेण्यात येत आहे. त्यावर नव्या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिलपासून प्रारंभ होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT