Job Search Dainik Gomantak
गोवा

Goa Job : गोव्यात परीक्षा नियंत्रकासह 'या' सहा पदांसाठी मागवले अर्ज

15 जानेवारीपर्यंत करता येणार अर्ज

Rajat Sawant

कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातूनच गोव्यातील नोकरभरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. तसंच यासाठी लागणाऱ्या कर्मचारी वर्गालाही राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. ‘राज्यात विविध खात्यांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले होते. दरम्यान, परीक्षा नियंत्रकासह सहा पदांच्या भरतीसाठी सराकारी अधिकाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

यापूर्वी नोकरभरतीमध्ये काही चुकीच्या घटना घडल्याच्या राज्य सरकारच्या निदर्शनास आले होते. याशिवाय गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नोकरभरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याची प्रकरणे समोर आली होती, त्यामुळे सरकारने भरतीसाठी यावेळेस कडक उपाययोजना राबविण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची पदे ही कर्मचारी भरती आयोगामार्फतच भरली जाणार आहेत.

परीक्षा नियंत्रक या पदासाठी 1 जागा, लेखा उपसंचालक या पदासाठी 1 जागा, लेखापाल या पदासाठी 1 जागा, हेड क्लार्क या पदासाठी 1 जागा, युडिसी\असिस्टंट या पदासाठी 2 जागा भरण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या विभागात काम करणार्‍या पात्र अधिकार्‍यांमधून प्रतिनियुक्तीच्या आधारावर नमूद केलेली पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 15 जानेवारीपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT