Offline Membership Applications Dainik Gomantak
गोवा

Digital Goa: घरोघरी इंटरनेट पोहोचवल्‍याचा सावंत सरकारचा दावा ठरला फसवा; 30 हजार सदस्यत्व अर्ज भरले ऑफलाईन

Internet Connectivity In Goa: कित्येक घरांपर्यंत इंटरनेट न पोहोचल्याने सत्ताधारी भाजपला तब्बल ३० हजार जणांचे सदस्यत्व अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरून घ्यावे लागले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्‍य सरकार सर्व घरांपर्यंत इंटरनेट पोहोचल्याचा दावा करत आहे. मात्र तसे नाही. कित्येक घरांपर्यंत इंटरनेट न पोहोचल्याने सत्ताधारी भाजपला तब्बल ३० हजार जणांचे सदस्यत्व अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरून घ्यावे लागले. भाजपच्या संघटन पर्वाचे राज्य निवडणूक अधिकारी प्रेमानंद म्हांबरे यांनी इंटनरनेटअभावी हे अर्ज भरून घ्यावे लागले अशी कबुली पत्रकार परिषदेत दिली.

म्‍हांबरे म्हणाले, हे अर्ज भरून घेतले असले तरी कार्यालयाच्या पातळीवर त्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने ॲपवर भरावी लागली. राज्यभरातील १ हजार ७०५ मतदानकेंद्र पातळीवर ४५ वयापेक्षा कमी वयाचा अध्यक्ष निवडणे हे यंदा मोठे आव्हान होते. कारण त्या व्यक्तीने पक्षासाठी अन्य जबाबदारीही पार पाडलेली असावी अशी अट होती.

राज्यभरात ४ लाख २५ हजाराहून अधिक जणांनी भाजपचे (BJP) सदस्यत्व घेतले. शिवाय १०० हून अधिक जणांची नाव नोंदणी करणाऱ्यांना शंभर रुपये शुल्क भरून सक्रिय सदस्य होता येते. असे ३ हजार २०५ जण भाजपचे सक्रिय सदस्य झाले आहेत. २ सप्टेंबरपासून ही प्रक्रिया सुरू झाली होती, असे म्‍हांबरे म्‍हणाले.

भाजपची ही सदस्यत्व २०३० पर्यंत वैध असेल असे सांगून म्‍हांबरे म्हणाले, ५३१ शक्ती केंद्र प्रमुखही नेमले जाणार आहेत. बाणावली, नुवे, मडकई आणि वेळ्ळी मतदारसंघात ५० टक्क्यांपेक्षा कमी सदस्‍यसंख्‍या असल्‍याने तेथे मतदानकेंद्र प्रमुख निवडता आला नाही. तसेच तेथे मंडळाची निवडणूक (Election) झालेली नाही. तेथे समिती मागावून नियुक्त करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT