Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa: सरकारने 200 कोविड मृतांचा आकडा लपविला- विजय सरदेसाईंचा आरोप

ही गंभीर बाब असून मुख्यमंत्री सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी लोकांच्या जीवाशी खेळू नये असा इशारा त्यांनी दिला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: कोविडमुळे (Covid 19) मृत्यू आलेल्या सुमारे 200 लोकांच्या मृत्यूंची सरकारने नोंदच केलेली नाही असा गंभीर आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी केला असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी या बाबत ताबडतोब खुलासा करावा अशी मागणी त्यानी केली आहे. कोविड व्यवस्थापन हाताळताना मुख्यमंत्री वारंवार शिथिल राहिलेले असून लोकांच्या माहितीसाठी जी रोज यादी जारी केली जाते त्या यादीत सुमारे 200 मृत्यूंची नोंदच नाही. ही गंभीर बाब असून मुख्यमंत्री सावंत यांनी लोकांच्या जीवाशी खेळू नये असा इशारा त्यांनी दिला.

वास्तविक कोविडशी मुकाबला करण्यासाठी सरकारने जे कृतीदल स्थापन केले त्याचा अध्यक्ष खरे तर एखादा तज्ज्ञ असण्याची गरज असताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपल्यालाच त्या दलाचा अध्यक्ष करवून घेतले आहे असे म्हणत हा खेळ नव्हे तर लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना लोकांच्या जीवाचे काही पडूनच गेलेले नाही असे वाटते असा आरोप सरदेसाई यांनी केला.

या 200 बळींची नोंद न करण्यामागचे कारण काय आणि त्याला जबाबदार कोण हे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. सरकारच्या अशा बेभरवशाच्या धोरणामुळेच गोव्यात 3000 पेक्षा जास्त लोकांना कोविडमुळे जीव गमवावा लागला असा आरोप सरदेसाई यांनी केला. या सरकारला लोकांचे पडून गेलेले नाही त्यांना फक्त निवडणुकीचे राजकारण करण्यात रस आहे . 2022 सालात या अशा गोयकार विरोधी सरकारला सत्ताभ्रष्ट करून गोयकारवादी सरकार आणण्याची गरज आहे. त्यासाठी गोवा फॉरवर्ड पार्टी हा एकमेव पर्याय आहे असे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राज्यात आधुनिक क्रीडा सुविधांसाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही; युवा क्रीडापटूंना संधी देण्यावर भर

Gorvancho Padwo: शेणाचे गोठे, कारिटांच्या गायी; 'गोरवांचो पाडवो' साजरा करण्याची गोव्याची अनोखी

India President: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत मोठी चूक, हेलिकॉप्टरच्या लँडिंगवेळी मोठा अपघात टळला; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल!

World Cup 2025: भारतीय महिला संघासाठी अस्तित्वाची लढाई; गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध महत्त्वाचा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी काय आहे समीकरण?

अग्रलेख: 40 वर्षांपूर्वी लावलेली रवि नाईकांच्या भूस्वाभिमानाची ज्योत आजही तेवत

SCROLL FOR NEXT