goa high court Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकार: तरुण तेजपालविरोधात आज सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात तेजपाल याने दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणी प्रलंबित असल्याने वारंवार तहकूब करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: सहकारी महिला कर्मचाऱ्यावरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या तरुण तेजपाल याच्याविरोधात राज्य सरकारने सादर केलेल्या आव्हान याचिकेवरील सुनावणी 14 मार्चला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर ठेवण्यात आली आहे. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात तेजपाल याने दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणी प्रलंबित असल्याने वारंवार तहकूब करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात ‘इन कॅमेरा’ सुनावणीबाबतच्‍या अर्जावर अजूनही सुनावणी झाली नसल्याने मागील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने ही सुनावणी 14 मार्चपर्यंत तहकूब केली होती. ही सुनावणी इन कॅमेरा घेण्याची विनंती करणारा तेजपालचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळला होता. त्याविरुद्ध त्याने सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर केला आहे.

तेजपाल याच्या अर्जावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आपल्यासमोर नको असे दोनवेळा झाल्याने ती वारंवार लांबणीवर पडत आहे. तेजपालच्यावतीने वकील अमित देसाई हे, तर गोवा सरकारतर्फे भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडत आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर येथील सुनावणी अवलंबून आहे.

तेजपालने राज्य सरकारच्या आव्हान याचिकेविरोधात सादर केलेल्या अर्जात ती सुनावणीस घेण्यायोग्य आहे का याबाबत तसेच सुनावणी झाल्यास ती इन कॅमेरा घ्यावी अशी विनंती केली होती. त्यातील इन कॅमेरासाठीची विनंती उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळली आहे. निर्दोषत्वाला आव्हान तसेच आव्हान देण्याइतपत ती योग्य आहे का, या दोन्ही मुद्यांवर पहिल्यांदा सुनावणी होईल व त्यावरील निर्णयावर पुढील सुनावणी अवलंबून असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT