CMs gift to goan women Free 3 LPG cylinders per year Dainik Gomantak
गोवा

Free Cylinder in Goa : वर्ष सरले तरी सरकारची मोफत तीन सिलिंडर योजना ‘गॅस’वर

37 हजार लाभार्थी वंचित; 36 कोटी रुपयांची तरतूद करण्यास विलंब

गोमन्तक डिजिटल टीम

Free Cylinder in Goa : भाजप सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळात जनतेला मोफत तीन सिलिंडर देण्याची घोषणा निवडणूक संकल्पनाम्यानुसार झाली होती. त्यानंतर ही योजना राबविण्याचे काम ग्रामीण विकास कल्याण खात्याकडे देण्यात आले. योजनेसाठी आठ-नऊ महिन्यांपूर्वी 36 कोटींची तरतूद करणे आवश्‍यक होते, पण त्यास विलंब होत गेला. त्यामुळे आता ही योजना पुढील वर्षी तरी अंमलात येणार की नाही, असा प्रश्‍न लाभार्थींना पडला आहे.

सरसकट कुटुंबांना मोफत तीन सिलिंडर देणे हे परवडणारे नाही, असे सरकारच्या लक्षात आले. या योजनेपोटी सरकारची तिजोरी रिकामी होण्याची भीती लक्षात येताच त्यासाठी कौटुंबिक आर्थिक उत्पादनाच्या अटी समोर आल्या. आर्थिक दुर्बल, त्याशिवाय पाच लाख रुपयांखाली आर्थिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना हे सिलिंडर देण्याचे ठरले.

त्यानुसार सुमारे 36 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आवश्‍यक होते. परंतु ही आर्थिक तरतूद करण्यात सरकारकडून विलंब होत गेला. आता ही योजना राबविण्यास झालेल्या विलंबाला सर्वस्वी ग्रामीण विकास कल्याण खात्याकडे बोट दाखविण्याचे काम सुरू झाले आहे.

मोफत तीन सिलिंडर देण्याची घोषणा मार्च महिन्यात झाली होती. त्यानंतर अमूक-तमूक महिन्यात ही योजना सुरू होईल, असे ग्रामीण विकास कल्याण खात्याकडून सांगितले जात होते. परंतु ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या निधीची तरतूद करणे आवश्‍यक होते, ते काम सरकारी पातळीवर झाले नाही. त्यामुळे या योजनेला विलंब होत आहे. 2022 हे वर्ष सरण्यासाठी सहा दिवस बाकी आहेत. जरी सहा दिवसांत सरकारी पातळीवर हालचाली झाल्या आणि ही योजना याचवर्षी मंजूर करून राबवायची झाल्यास सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ही योजना प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यास तिचा लाभ 37 हजार कुटुंबांना होणार आहे.

मंत्रिमहोदय संपर्काबाहेर

भाजप पुन्हा सत्तेत येण्यास या आश्‍वासनाचा मोठा वाटा आहे. परंतु पहिल्याच मंत्रिमंडळाने मोफत तीन सिलिंडर देण्याचा घेतलेला निर्णय दहा महिने झाला तरी रखडलेला आहे. याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ग्रामीण विकासमंत्री गोविंद गावडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fake Wedding Party: ना सासरचं टेन्शन, ना खर्चाची चिंता! गोव्यात 'फेक वेडिंग' इव्हेंटनं तरूणांना दिला लग्नसोहळ्याचा अनुभव

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत निसर्ग कोपला, ढगफुटीमुळे घरं गेली वाहून; कित्येकजण बेपत्ता

कॅसिनोंमध्ये बेकायदा लाइव्ह गेमिंग सुरूच; पोस्टाच्या स्कॅमनंतर सरदेसाईंचे आणखी एक स्टिंग ऑपरेशन, शेअर केला VIDEO

Team India: टीम इंडियावर संकटाचे ढग! रोहित-विराट एकदिवसीय विश्वचषक खेळणार नाही? समोर आली मोठी अपडेट

Sub-Junior Aquatics Championships: गोव्याच्या पूर्वी नाईकचा राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दमदार परफॉर्मन्स; 2 सुवर्ण, 1 रौप्य जिंकलं

SCROLL FOR NEXT