Maharashtra Assembly Elections 2024 Dainik Gomantak
गोवा

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे.

Pramod Yadav

Maharashtra Assembly Elections 2024

पणजी: महाराष्ट्र विधानसभेसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी आता केवळ एक दिवस शिल्लक आहे. राज्य मतदानासाठी सज्ज होत असताना गोवा सरकारने देखील येथे काम करणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना भरपगारी सुट्टी जाहीर केलीय. सुट्टीबाबतचा सरकारी आदेश देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

गोवा सरकारच्या वतीने याबाबत आदेश जारी करण्यात आलाय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदानासाठी पगारी सुट्टी असेल. कंपनीत काम करणारे काम कामगार, सरकारी विभागातील कर्मचारी, खासगी क्षेत्रातील कामगारांना सुट्टी असेल, असे आदेशात म्हटले आहे.

Maharashtra Assembly Elections 2024 Goa Government Order

महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रचाराच्या तोफा आज (१८ नोव्हेंबर) थंडावत आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडीने राज्यभर जोरदार प्रचार केला असून, राज्यात कोणाची सत्ता येणार याबाबत उत्सुकता ताणली गेलीय. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे २३ रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT