सरकार तुमच्या दारी कार्यक्रमाची बैठक संपन्न  Dainik Gomantak
गोवा

Goa: 'सरकार तुमच्या दारी' मुख्यमंत्रीचा जनतेशी संवाद

मुख्यमंत्री डॉ. सावंत हे या कार्यक्रमांतर्गत जनतेशी संवाद साधणार आहेत. 'सरकार तुमच्या दारी' उपक्रमांतर्गत सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी डिचोलीत उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमन्तक

डिचोली: उद्या रविवारी डिचोलीत होणाऱ्या 'सरकार तुमच्या दारी' ('Government at your door') या कार्यक्रमाचा डिचोलीसह मये मतदारसंघातील जनतेला लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. अशी माहिती मयेचे जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर आणि भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद महांबरे यांनी दिली. यावेळी भाजप प्रदेश सचिव आरती बांदोडकर, मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, सचिव विश्वास चोडणकर आणि कृष्णा परब हे उपस्थित होते.

उद्या रविवारी डिचोलीतील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक (Shantadurga High School)विद्यालयात सकाळी 9 वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे या कार्यक्रमांतर्गत जनतेशी संवाद साधणार आहेत. 'सरकार तुमच्या दारी' उपक्रमांतर्गत सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी डिचोलीत उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमातून जनतेला सरकारी योजनांची माहिती मिळवणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर प्रशासकीय (Administrative)अडीअडचणीही अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याव्यतिरिक्त आरोग्य विषयक तपासणीही करण्यात येणार आहे. लसीकरणाचा दुसरा डोस देण्याचीही व्यवस्था असेल. अशी माहिती प्रेमानंद महांबरे यांनी दिली. मये मतदारसंघातील 7 ही पंचायत क्षेत्रातील जनतेने या अभिनव उपक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन मये भाजप(BJP) मंडळाने यांनी केले आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या 'सरकार तुमच्या दारी' या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT