E mark Dainik Gomantak
गोवा

E Mark : सावधान! पुढे वृध्द वाहन चालवित आहे; वाहतुकमंत्र्यांच्या हस्ते 'ई' बोध चिन्हाचे अनावरण

रोटरी क्लब ऑफ मिरामार व राज्य सरकारच्या सहकार्याने 'ई' बोध चिन्ह तयार

गोमन्तक डिजिटल टीम

कृपया वृद्ध चालकांचा आदर राखा, धीर धरा ' अशा 'ई' बोध चिन्हाचे अनावरण वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले. रोटरी क्लब ऑफ मिरामार यांच्या पुढाकाराने, राज्य सरकारच्या सहकार्याने राज्यातील जेष्ठ वाहन चालविणांर्‍या चालकांसाठी 'ई' बोध चिन्ह तयार केले आहे. वृद्ध चालकांचा आदर करणे, त्यांचा सन्मान राखण्यासाठी इतर वाहनचालकांनी 'ई' बोध चिन्ह असलेल्या वाहनांचा आदर राखण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन वाहतुक मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले आहे.

नवेवाडे- दाबोळी येथील भाजप कार्यालयात रोटरी क्लब ऑफ मिरामार यांच्या सौजन्याने वाहन चालवणाऱ्या वृद्ध चालकांसाठी 'ई' बोध चिन्हाचे अनावरण मंत्री गुदिन्हो यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ मिरामारच्या अध्यक्ष प्रिती शेट, लकी सिंग, भावना रायकर, श्रेयस लोटलीकर, दाबोळी भाजप गटाध्यक्ष संदीप सूद व इतर जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री गुदिन्हो म्हणाले की, राज्यात वाहन चालवणाऱ्या वृद्ध चालकांनी आपल्या वाहनावर 'ई ' बोधचिन्ह लावावे. यामुळे मागून येणारे वाहन आपला अवश्य आदर राखेल. तसेच राज्यातील युवा वाहन चालकांनी 'ई' बोध चिन्ह असलेल्या वृद्ध चालकांना त्रास देऊ नये. रोटरी क्लब ऑफ मिरामार यांनी वृद्ध चालकांचा खऱ्या अर्थाने आदर राखला असून ते अभिनंदनास पात्र असल्याची माहिती वाहतुक मंत्री गुदिन्हो यांनी दिली.

राज्यातील ' विन्टेज वाहनांना' नवीन क्रमांक देण्याचा राज्य वाहतुक विभागाचा प्रयत्न आहे. यामुळे पुर्वीच्या वाहनांना रस्त्यावर धावण्याची पुन्हा संधी प्राप्त होईल. तसेच विन्टेज वाहनांमुळे पर्यटन क्षेत्राला देखिल बऱ्या पैकी लाभ होईल अशी माहिती मंत्री गुदिन्हो यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT