Goa Airports Gold Smuggling: Dainik Gomantak
गोवा

Goa Gold Smuggling: गोवा पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राज्यातील विमानतळांवरील सोने तस्करीत हात

महसूल गुप्तचर संचलनालयाची माहिती; 3 महिन्यात 10 कोटी रुपयांचे 3 किलो सोने केले जप्त

Akshay Nirmale

Goa Airports Gold Smuggling: गोव्यातील विमानतळांवर अलीकडच्या काळात सोने तस्करीचे प्रकार उघडकीस आले होते. या पाठीमागे पाकिस्तानी दहशतवादी आहेत. पाकच्या दहशतवादीच या सोने तस्करीत गुंतले आहेत, अशी माहिती महसूल गुप्तचर संचलनालय (DRI) ने दिली आहे.

संचलनालयाने म्हटले आहे की, मध्यपुर्वेतील देशांमधून गोव्यात झालेल्या सोने तस्करीच्या घटनांमागे पाकिस्तानी दहशतवादी आहेत. सोन्यातून मिळणारा पैसा देशात देशविरोधी कारवायांसाठी वापरला जातो.

मोपा विमानतळावरून दररोज गोव्यात सोन्याची तस्करी होत असल्याचा डीआरआयचा संशय आहे. तस्करांना पकडण्यासाठी त्यांनी आता आपली दक्षता वाढवली आहे आणि त्याचे स्रोत अधिक सक्रिय केले आहेत.

डीआरआयने सांगितले की, जे लोक तस्करीत पकडले गेले आहेत त्यांना हे माहितीच नाहीय की ते अवैध काम करत आहेत. सोने वाहून नेणे सोपे आहे आणि नंतर भारतात हार्ड कॅशसाठी त्याचा वापर केला जातो. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, तस्कर मध्यपूर्वेमध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांच्या घरी येतात. स्मगलर्सकडून अशा लोकांच्या परतीच्या विमान तिकीटांची व्यवस्था मोफत करण्याची तसेच इतर खर्च देखील करण्याचे सांगतिले जाते. अशा प्रकारे त्यांना राजी करून त्यांच्याकडून सोने भारतात आणले जाते.

गेल्या तीन महिन्यांत डीआरआयने 10 कोटी रुपयांचे 3 किलो सोने जप्त केले आहे. डीआरआयने सांगितले की, उत्तर गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दक्षिण गोव्यातील दाबोळी येथील जुन्या विमानतळाचा वापर करून भारतात सोने आणत आहेत.

जेव्हा मोपा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली, तेव्हा तस्करांनी तेथील असुरक्षिततेचे तसेच तेथील सुरक्षितता कशी भेदता येईल, याचा अभ्यास केला होता. त्यानंतरच सोन्याची तस्करी करण्यासाठी विमानतळाचा वापर ते करू लागले."

डीआरआयने सांगितले की, वाहकाचे काम एखाद्या नियुक्त व्यक्तीला, अनोळखी व्यक्तीकडे माल पाठवणे हे आहे. त्यानंतर ही खेप गोव्याबाहेर पाठवली जाते.

डिसेंबरमध्ये डीआरआयने अबू धाबी येथून 2.2 कोटी रुपयांच्या 3.5 किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी दोघांना अटक केली होती. मोपा विमानतळावर नितेश सैनी याची चेक इन केलेली बॅग नेहमीपेक्षा जड होती.

त्यात फ्लोअर-स्प्रिंग मशिन (मेकॅनिकल दरवाजा बंद करणारे उपकरण) होते. मशिनच्या एक्स रे तपासणीत दिसून आले. मशीनमध्ये 3.5 किलो वजनाचे सोन्याचे डिस्क आणि रॉड सापडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Gochar 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात अमाप नफा अन् शत्रूंची उडणार दाणादाण; 'या' 3 राशींवर शनिदेवाची कृपा

Goa Crime: म्हापसा हादरलं! अपार्टमेंटजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; मृत्यूचं कारण अद्याप गुलदस्त्यात

Rajpal Yadav: विमानतळाप्रमाणे जेलमध्येही हवा 'स्मोकिंग झोन', तिहार तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवची अजब मागणी; काय म्हणाला नेमका?

Goa vs Kerala Women's Cricket: शतकी सलामीनंतरही गोवा पराभूत, सीनियर महिला एकदिवसीय स्पर्धेत केरळचा मोठा विजय

Poonam Pandey: पूनम पांडेच्या निशाण्यावर बडे क्रिकेटर्स? 'मेसेज' करून काय मागतात? स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT