Goa girls won the bronze medal in the 33rd National Sub-Junior Kabaddi Tournament Dainik Gomantak
गोवा

National Sub-Junior Kabaddi Tournament: गोव्याच्या पोरी लय लढल्या; राष्ट्रीय सबज्युनियर कबड्डी स्पर्धेत मिळवले 'ब्राँझ'

National Sub-Junior Kabaddi Tournament: गोव्याच्या मुलींनी 33व्या राष्ट्रीय सबज्युनियर कबड्डी स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले.

किशोर पेटकर

National Sub-Junior Kabaddi Tournament: गोव्याच्या मुलींनी 33व्या राष्ट्रीय सबज्युनियर कबड्डी स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले. उपांत्य फेरी गाठल्यानंतर हरियाणाकडून 24-31 असा सात गुणफरकाने पराभव पत्करावा लागला, त्यामुळे ब्राँझवर समाधान मानावे लागले. बिहारमधील पाटणा येथे झालेल्या या स्पर्धेत हरियाणाने राजस्थानला चुरशीच्या लढतीत 35-33 असे हरवून विजेतेपद पटकावले. राजस्थानला रौप्यपदक मिळाले.

दरम्यान, गोव्याच्या मुलींनी मंगळवारी रात्री उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशला 53-29 गुणफरकाने हरवून उपांत्य फेरी गाठली होती. त्यापूर्वी, उपउपांत्यपूर्व लढतीत गोव्याने तेलंगणास 53-28 असे हरवले होते. स्पर्धेच्या ‘ग’ गटसाखळी फेरीत तिन्ही सामने जिंकून अग्रस्थान मिळवताना गोव्याने अनुक्रमे पश्चिम बंगाल (44-16), केरळ (44-8), बिहार (47-16) या संघांवर मात केली होती. स्पर्धेत गोव्याच्या मुलींनी पाच विजय आणि एक पराभव अशी कामगिरी बजावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT