MLA Praveen Zantye Dainik Gomantak
गोवा

Goa: 'नोकऱ्या मिळवून द्या' भंडारा समाजाचे आमदार झांट्येंना निवेदन

अशी मागणी डिचोली तालुका भंडारी समाजातर्फे मयेचे आमदार प्रवीण झांट्ये (MLA Praveen Zantye) यांच्याकडे करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: मये मतदारसंघातील (Maye Constituency) भंडारी समाजातील (Bhandari Community) बेरोजगारांना आरक्षण कोट्यातून नोकऱ्या मिळवून देण्यासाठी आमदार या नात्याने प्रयत्न करावेत. अशी मागणी डिचोली तालुका भंडारी समाजातर्फे मयेचे आमदार प्रवीण झांट्ये (MLA Praveen Zantye) यांच्याकडे करण्यात आली आहे.

समाजाचे डिचोली तालुका अध्यक्ष आनंद नार्वेकर (Anand Narvekar) यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या शिष्टमंडळाने रविवारी डिचोली येथे आमदार झांट्ये यांची भेट घेवून भंडारी समाजाच्या मागण्यासंदर्भात चर्चा करून त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. आमदारांची भेट घेतलेल्या या शिष्टमंडळात उपाध्यक्ष मनोजकुमार घाडी, महिला समिती सचिव विदीक्षा बुगडे, खजिनदार ज्योस्त्ना चुंबाळकर, उपाध्यक्ष शांती पांडरे, मये ग्राम समिती अध्यक्ष अविनाश होबळे, कारापूर ग्रामसमिती अध्यक्ष सचिन गुरव, युवा अध्यक्ष ओंकार कांदोळकर, शिवम पांडरे, अनिल उसगावकर यांचा समावेश होता.

यावेळी आनंद नार्वेकर आणि मनोजकुमार घाडी यांनी समाजाच्या मागण्यासंदर्भात आमदारांकडे चर्चा केली. डिचोली तालुक्यात भंडारी समाज भवन उभारण्यासाठी सहकार्य करावे. आदी मागण्यांही शिष्टमंडळाने आमदारांसमोर मांडल्या. आमदार झांट्ये यांनी समाजाच्या मागण्या ऐकून सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मनोजकुमार घाडी यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Domestic Violence Case: 4 तास अघोरी छळ आणि जीवघेणा ड्रामा! हिस्ट्रीशीटरचा बायकोवर अमानुष अत्याचार; 25 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

SCROLL FOR NEXT