Ganesh Visarjan  Dainik Gomantak
गोवा

Ganesh Visarjan: गोव्यात गणेश विसर्जनाची चोख व्यवस्था, 47 ठिकाणी जीवरक्षक तैनात; वाचा यादी

Ganpati Visarjan: तैनात करण्यात आलेले प्रशिक्षित जीवरक्षक विसर्जनावेळी मदत करणार असून आपत्कालीन परिस्थितींमध्ये तातडीने बचावकार्य करण्याची जबाबदारी सांभाळतील.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने घरोघरी पाच दिवस श्री गणरायाचे पूजन केले जाते. दीड दिवसांच्या गणपतीनंतर आज पाच दिवसांच्या गौरी तसेच गणपतीचे विसर्जन करत देवाला पुढच्या वर्षी लवकर या आदी जयघोषात भक्तीमय वातावरणात बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे.

राजधानी पणजीत मानशी, रुअ दि ओरे, मांडवी नदी आणि मिरामार येथे समुद्रात गणपती विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. तसेच ‘दृष्टी’ एजन्सीतर्फे राज्यभरातील समुद्रकिनारे तसेच नदीच्या काठावर ४७ ठिकाणी जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. त्यासोबतच विसर्जनावेळी लहान मुलांना किनाऱ्यांवर घेऊन जाताना त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

तैनात करण्यात आलेले प्रशिक्षित जीवरक्षक विसर्जनावेळी मदत करणार असून आपत्कालीन परिस्थितींमध्ये तातडीने बचावकार्य करण्याची जबाबदारी सांभाळतील. विसर्जन सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी हे जीवरक्षक रात्री उशिरापर्यंत कार्यरत राहतील. ज्या ठिकाणी सार्वजनिकरीत्या पाण्यात उतरणे धोकादायक ठरू शकते, तेथे हे जीवरक्षक समूहांना सुरक्षितपणे मूर्ती पाण्यात नेऊन विसर्जन करण्यास साहाय्य करतील.

जीवरक्षक तैनात असलेले समुद्रकिनारे

उत्तर गोवा : कळंगुट, कांदोळी, वागातोर, हरमल, मांद्रे, केरी, अश्वे, मोरजी, बागा, शिकेरी, हणजूण, मिरामार आणि शिरदोण.

दक्षिण गोवा : बायणा, बोगमाळो, माजोर्डा, बेताळभाटी, बाणावली, गालजीबाग, तळपण, वार्का, केळशी, मोबोर, अगोंद, पाळोळे, पोळे आणि इतर समुद्रकिनारे.

त्यासोबतच, म्हापसा तार, हळदोणे तलाव, पणजी फेरी पॉईंट, मोरजी तलाव, कुंभारजुवे फेरी पॉईंट, बेती फेरी पॉईंट, बायणा-खारेवाडा, तसेच ग्रामपंचायत, सार्वजनिक संस्था आणि नगरपालिका यांच्या विनंतीनुसार प्रत्येक ठिकाणी दोन ते सहा जीवरक्षक नेमले जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन आवस्थी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bits Pilani: 'कुठल्याही विद्यापीठाला, गोव्याला अशा घटना परवडणार नाहीत'! ‘बिट्स’ कॅम्पसचे पैलू; वास्‍तव आणि समस्‍या

Delivery Death Case: प्रसूतीदरम्यान 41 वर्षीय महिलेचा मृत्यू, निष्काळजीपणाचा ठपका; डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल

New GST Rates: 'गोव्यात अधिक संख्येने पर्यटक येतील', CM सावंतांचे प्रतिपादन; जीएसटीमुळे खाण क्षेत्रालाही लाभ होण्याचा दावा

BITS Pilani: प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल, हैद्राबादहून गोव्यात आला; ‘बिटस पिलानी’तील विद्यार्थ्याच्या मृत्युचे गूढ कायम

Teachers' Day History: भारतात शिक्षक दिनासाठी 5 सप्टेंबरच का निवडला? डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाशी जोडलेला 'तो' किस्सा जाणून घ्या

SCROLL FOR NEXT