Sameer Amunekar
शक्यतो घरीच छोट्या टाकीत, बादलीत किंवा कृत्रिम तलावात विसर्जन करा.
फक्त शाडूच्या किंवा पर्यावरणपूरक मूर्तींचंच विसर्जन करा.
हार-फुलं, नैवेद्य यांचा कचरा पाण्यात न टाकता वेगळा गोळा करून खतासाठी वापरा.
प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल सजावट पाण्यात अजिबात टाकू नका.
कमी पाण्यात, लहान कृत्रिम टाकीत विसर्जन करून जलस्रोत स्वच्छ ठेवा.
नदी-तलावाच्या खोल भागात जाऊ नका; विसर्जनाच्या वेळी लहान मुलांना आणि वृद्धांना सोबत ठेवा.
विसर्जनानंतर जागा स्वच्छ ठेवा, कचरा विखुरू नका.