Quepem Ganeshotsav Dainik Gomantak
गोवा

वीस अलिशान कार सोबत कोट्यवधींची कॅश प्राईज! केपेत गणेशोत्सवाच्या पावतीसाठी पहाटे तीनपासून झुंबड

Goa Ganesh Chaturthi 2024: घरगुती आणि सार्वजनिक स्तरावर साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेश महोत्सवासाठी सर्वत्र लगबग सुरु झाली आहे.

Pramod Yadav

सांगे तालुक्यातील सार्वजनिक मंडळाने आगामी गणेशोत्सवानिमित्त 2BHK आणि 27 लाख रोख रक्कमेच्या पहिल्या बक्षिसांसह एक कोटी 46 लाख रुपयांच्या एकूण बक्षिसांची घोषणा केली. त्यानंतर आता केपे तालुक्यातील एका मंडळाने तब्बल वीस कार आणि त्यासोबत लाखोंची बक्षीसं जाहीर केलीयेत.

या सार्वजनिक मंडळाच्या तिकीट खरेदीसाठी मुसळधार पाऊस, थंडी, वाऱ्याची तमा न बाळगता नागरिकांनी शनिवारी (०३ ऑगस्ट) पहाटे तीनपासून गर्दी केली.

गोव्यातील एक सर्वात मोठा उत्सव म्हणून साजरा होणारा गणेशोत्सव जवळ आला आहे. घरगुती आणि सार्वजनिक स्तरावर साजऱ्या केल्या जाणाऱ्या या महोत्सवासाठी सर्वत्र लगबग सुरु झाली आहे. सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने लकी ड्रॉ सोडत ठेवली असून, याचे तिकीट घेण्यासाठी राज्याच्या विविध भागातील नागरिक गर्दी करत आहेत.

केपे तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या महाप्रसाद पावतीची विक्री शनिवारी (०३ ऑगस्ट) सकाळी आठ वाजता सुरु झाली. मात्र, या पावती खरेदीसाठी पहाटे तीन वाजल्यापासूनच नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली. मुसळधार पाऊस सुरु असताना थंडी-वाऱ्याची तमा न बाळगता नागरिकांनी पावती खरेदीसाठी रांग लावल्याचे पाहायला मिळाले.

Quepem Mandal Receipt

मंडळाने या पावतीला महाप्रसाद पावती असे नाव दिले असून, त्याची खरेदी किंमत पाचशे रुपये आहे. पावती खरेदीसाठी पैसे रोखीने घेतले जात असल्याने अनेक इच्छुकांनी एटीएममधून पैसे काढले, त्यामुळे परिसरातील एटीएममध्ये कॅश संपल्याचे आढळून आले.

पावती खरेदीसाठी मोठी रांग असल्याने गर्दी नियंत्रण करण्यासाठी पावती विक्रीस्थळी पोलिस बंदोबस्त देखील पाहायला मिळाला.

मंडळाच्या वतीने महागड्या वीस गाड्या आणि तब्बल एक कोटी ३२ लाख रुपये बक्षीस स्वरुपात दिले जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT