Ganesh Chaturthi  Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi Festival: गणेश उत्सव समित्यांना दहशतवादविरोधी पथकाने दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास पोलीस नियंत्रण कक्षाला तत्काळ कळवावे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Ganesh Chaturthi Festival गणेश चतुर्थी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. सर्वत्र सणांची धामधूम सुरु असून बाजारपेठादेखील सजल्या आहेत.

परगावी राहणारे गणेश चतुर्थीसाठी गोव्यात येत असून या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोवा पोलिसांसह दहशतवादविरोधी पथक देखील सज्ज झाले आहे.

नागरिकांना विशेषतः राज्यातील गणपती मंडळांना दहशतवादविरोधी पथकाकडून सुरक्षिततेच्या कारणास्तव काही सूचना करण्यात आल्या आहेत. या संबंधीची प्रेस नोट त्यांनी जाहीर केलीय.

यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे कि, गणेश मंडळाची सुरक्षिततेच्या कारणास्तव तपासण्यासाठी भेट देण्यात येणार असून उत्सवादरम्यान मंडळाच्या सदस्यांना कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्यांनी 100/7875756000 हा नंबर डायल करून पोलीस नियंत्रण कक्षाला तत्काळ कळवावे.

मंडळ परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा कोणत्याही संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सुरक्षेच्या उद्देशाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक असून गणेश उत्सव समितीचे जबाबदार सदस्य- पदाधिकारी यांनी घटनास्थळी उपस्थित राहणेही आवश्यक आहे.

या उत्सव काळात गणेश उत्सव समितीकडून शक्य असल्यास मौल्यवान वस्तूंच्या रक्षणासाठी रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक तैनात आवश्यक आहे.

मंडळाच्या आसपास फटाके फोडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती मंडळाच्या परिसरात अग्निशमन उपकरणे तयार ठेवणेही आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT