coconat tree Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ‘फलोत्पादना’द्वारे 13 पाडेली उपलब्ध

आवश्‍यकतेनुसार पुरवठा : मडगाव, बार्देश, पणजीत अधिक मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी, राज्यात शहरी भागात पाडेली मिळणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याने नागरिकांना पाडेली मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन गोवा फलोत्पादन महामंडळाद्वारे १३ पाडेलींची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे पाडेली ज्या नागरिकांना नारळ उतरविण्यासाठी हवे असतील ते फलोत्पादन महामंडळात किंवा जारी करण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून त्यांना अर्ध्या दिवसासाठी, पूर्ण दिवस किंवा प्रतिमाड अशा पद्धतीने आपल्या आवश्‍यकतेनुसार बोलावू शकतात.

याबाबत सांगताना गोवा फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापक चंद्रहास देसाई म्हणाले, राज्यातील शहरी भागात प्रामुख्याने पाडेलींची आवश्‍यकता अधिक असते, त्यामुळे आम्हाला मडगाव, बार्देश, पणजी या भागातून पाडेलींची मागणी मोठ्या प्रमाणात असते. सांगे, केपे, काणकोण आदी भागात पाडेली मिळतात त्यामुळे तेथे मागणी कमी असते.

फलोत्पादनाच्या पाडेलींद्वारे आकारण्यात येणारे दर

नारळ उतरवायच्या माडांची संख्या आकारण्यात येणारे दर

१ ते ८ १०० रुपये प्रतिमाड

१ ते १८ (अर्धा दिवस) १,१०० रुपये व ५ नारळ

१ ते ३५ २,१०० रुपये व १० नारळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT