नेत्रचिकित्सा शिबिराची पाहणी करताना पंचायत मंत्री माविन गुदिन्हो सोबत जिल्हा पंचायत उपाध्यक्ष श्रीम. दीक्षा कांदोळकर, एड. अनिता थोरात व इतर Dainik Gomantak
गोवा

गोवा पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत मोफत 'नेत्र चिकित्सा' शिबिर

पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन

Dainik Gomantak

Goa: गोवा पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत (Women's Empowerment Campaign) पंचायत मंत्री माविन गुदिन्हो (Minister Mauvin Godinho) यांच्या मार्गदर्शनाखाली आज चिखली पंचायत सभागृहात मोफत नेत्र चिकित्सा (Free Eye Check up) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सदर शिबिर जिल्हा पंचायत सदस्य सदस्य ॲड. अनिता थोरात यांच्यातर्फे चिखली ग्रामपंचायत व मुंबई येथील मातोश्री सेवा धाम आरोग्य सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पंचायत उपाध्यक्ष तथा महिला शक्ती अध्यक्षा श्रीमती दीक्षा कांदोळकर, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, दाभोळी मंडळ अध्यक्ष संदीप सूद, पंचायत सरपंच संकल्प महाले, पंचायत सदस्य लक्ष्मण कवळेकर, युवराज वाईकर, मारी मास्कारेन्हस, दिपाली चिपकर, सारिका नाईक, नगरसेवक सुदेश भोसले, विनोद किनळेकर, समाजसेवक वामन चोडणकर, रेमंड कारव्हालो, ब्रह्मा पवार, सानिया नाईक व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचा लोकांनी मोठ्या प्रमाणात लाभ उठविला.

दरम्यान गोवा पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22, 23 व 24 ऑक्टोबर रोजी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार दि. 22 रोजी सकाळी 10 वाजता सांकवाळ पंचायतीच्या सहकार्याने झुआरीनगर येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपजवळ शनिवार दि. 23 रोजी सकाळी 10 वाजता झुआरीनगर येथील एमईएस महाविद्यालयाच्या आवारात तर रविवार दि. 24 रोजी सकाळी 10 वाजता बोगमाळो पॅरिशनर्सच्या सहकार्याने बोगमाळो येथील चर्चच्या सभागृहात आयोजन करण्यात आले असून या मोफत नेत्रचिकित्सा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन जिल्हा पंचायत सदस्य ॲड. अनिता थोरात यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT