Marago Vijai Sardesai Janata Darbar  Dainik Gomantak
गोवा

आमदार विजय सरदेसाई जाणून घेणार लोकांच्या समस्या, चतुर्थीनंतर पुन्हा राज्यभर 'जनता दरबार'

Goa Forward: लोकांचे प्रश्‍न मांडण्यात सरदेसाईंना यश; मोहनदास लोलयेकर

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: विधानसभा अधिवेशनापूर्वी ‘गोवा फॉरवर्ड’चे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी तालुकावार ‘जनता दरबार’ भरवला. त्याद्वारे लोकांच्या समस्या जाणून त्या विधानसभेत मांडण्यात ते यशस्वी ठरले.

विरोधकांची संख्या कमी असूनही ते सरकारला वरचढ ठरले. त्यामुळे हा ‘जनता दरबार’ उपक्रम चतुर्थीनंतर पुन्हा राज्यभर सुरू करून सरकारच्या आश्‍वासनांचा पाठपुरावा केला जाईल,असे पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

आमदार विजय सरदेसाई यांची विधानसभेतील कामगिरी पाहून लोक त्यांनाच विरोधी पक्षनेते म्हणू लागले आहेत. त्यांनी सामान्य लोकांच्या समस्या विधानसभेत चोखपणे मांडल्या. त्यामुळे ते लोकांना जवळचे वाटताहेत,असेही लोलयेकर म्हणाले.

‘रोमी’ चा मुद्दा भाषा तज्ज्ञांनी हाताळावा!

रोमी लिपी हा विषय भाषेसंदर्भातचा आहे. रोमी लिपी विविध भाषांतून वापरली जाते. ती इंग्रजी, देवनागरी, कन्नड या भाषांतूनही वापरण्यात येते. त्यामुळे हा रोमी लिपीचा विषय राजकारण्यांपेक्षा भाषा तज्‍ज्ञांनी हाताळून तो सोडवायला हवा.

राजकारण्यांनी त्यात न पडता भाषा तज्ज्ञांचा त्यामध्ये सरकारने सल्ला घ्यावा, असे मत गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT