Vijai Sardesai
Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

MLA Vijay Sardesai: गोव्‍यात रामराज्‍यच नाही; गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई

दैनिक गोमन्तक

MLA Vijay Sardesai: सरकार उत्सवी वातावरण तयार करत असले तरी गोव्यात खचितच रामराज्य नाही, असा टोला गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत लगावला. सर्वसामान्य माणूस महागाईच्‍या वणव्‍यात होरपळला जातोय. बेरोजगारी वाढत चालली आहे.

राज्यात गोमंतकीय अल्पसंख्याक होण्याची भीती आहे. कला-संस्कृती धोक्यात आली असून ‘गोंयकारपण’ संपत चालले आहे, असेही ते म्‍हणाले.

पणजीतून बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी होतात, त्यांना पुणे पोलिस पकडतात. अमलीपदार्थांचा व्यापार करणाऱ्यांना हैदराबाद पोलिस जेरबंद करतात. मग गोवा पोलिस करतात काय? गोव्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे विवाहनोंदणी प्रमाणपत्रे मिळतात, वाहने हस्तांतरित होतात हे धोकादायक आहे.

दहशतवादी याचा गैरफायदा घेऊ शकतात. मात्र सरकार ‘सुशेगाद’ आहे. महोत्सव साजरे करण्यात मग्न आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला.

रात्री हेमंत सोरेन यांनी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांसह राजभवनात जात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा दिला. त्याचवेळी त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी चंपई सोरेन यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली. चंपई सोरेन यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे ४३ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.

त्यामुळे आता चंपई हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील. झारखंड मुक्ती मोर्चाच्या सर्वच आमदारांनी रात्री राजभवनाच्या दिशेने धाव घेतली होती. नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रात्रीच पार पडला पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरल्याने काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यासाठी राज्यपालांनी आजच वेळ देण्यास नकार दिला.

आज दुपारी दीडच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकले. यावेळी शासकीय निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते गोळा झाले होते. त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी त्यांची सात तास चौकशी केली.

ही चौकशी संपताच सोरेन तातडीने राजभवनाच्या दिशेने रवाना झाले आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला. यावेळी ‘ईडी’चे अधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते. तत्पूर्वी सोरेन यांना ‘ईडी’कडून चौकशीसाठी दहावेळा समन्स बजावण्यात आले होते पण त्यांनी चौकशीला सामोरे जाणे टाळले होते. अखेर आज त्यांनी चौकशीला सामोरे जाणे पसंत केले.

दुसरीकडे सोरेन यांनी एससी-एसटी ठाण्यातच ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी मध्यंतरी सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापे घातले होते. आपली आणि आपल्या समुदायाची प्रतिमा मलिन करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची तक्रार सोरेन यांच्याकडून करण्यात आली आहे.

रांचीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंदनकुमार सिन्हा म्हणाले,‘‘ ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी अर्ज केल्यानंतर आम्ही ही कारवाई केली.’’ ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा घालून ३६ लाख रुपयांची रोकड, एक मोटार आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती.

काजू, भेंडी, वांगी, मिरची आदी कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळाले, पण शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा झाला? बाजारात येणारे नकली काजू थांबलेले नाहीत. विदेशातील काजू गोमंतकीय काजू म्हणून विकले जातात. मग भौगोलिक मानांकन काय कामाचे?
- विजय सरदेसाई, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ozari Waterfall Trek: GTDC चे रविवारी वजीर धबधब्यावर ट्रेकिंग; कसा असणार प्रवास आणि फी जाणून घ्या

Panjim: आश्‍‍चर्य! पणजीत एकही नाही धोकादायक इमारत, सार्वजनिक बांधकाम खात्‍याचा दावा

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

Bloomberg Billionaires Index: एलन मस्क यांनी पुन्हा दाखवला जलवा, संपत्तीत मोठी वाढ; अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट

SCROLL FOR NEXT