Vijai Sardesai And DGP Jaspal Singh  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात PSI भरती घोटाळा, विजय सरदेसाईंचा आरोप; पोलीस महासंचालकांची घेतली भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून भरती प्रकरणातील भ्रष्टाचाराची माहिती देणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

PSI Recruitments: पोलिस उपनिरिक्षक (PSI) भरतीवरून गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई (Vijai Sardesai) चांगलेच आक्रमक झाले आहेत. गोवा राज्याने केलेल्या भरतीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार देसाई यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत केला. याच प्रकरणावरून सरदेसाई यांनी गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंह (DGP Jaspal Singh) यांची भेट घेतली आहे. पोलिस उपनिरीक्षक भरती रद्दबातल करावी अशी मागणी सरदेसाई यांनी जसपाल यांच्याकडे केली आहे.

तसेच, राज्यातील अवैध कसिनो बाबत देखील सरदेसाई यांनी जसपाल यांना माहिती दिली.

आमदार विजय सरदेसाई यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेतली. गोव्यातील पोलिस उपनिरिक्षक भरती एक गुन्हेगारी कट असल्याचे आरोप सरदेसाई यांनी केला. भरतीत ज्या उमेदवारांना 15 ते 30 गुण मिळाले आहेत. त्यांनी दुसऱ्या दिवशी पोलिस उपनिरिक्षक चाचणीत 83 ते 99 गुण मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात राजकीय नेते तसेच काही अधिकारी सहभागी असल्याची मला शंका आहे. असे विजय सरदेसाई म्हणाले.

पोलिस उपनिरिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी केली जावी, यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती केली जावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच, दोषी आढणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी. आणि कारवाई केली नाही तर उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा विजय सरदेसाई यांनी दिला आहे.

नापास झालेल्या उमेदवारांना देखील पोलिस उपनिरिक्षक चाचणीत कसे गुण मिळतात असा प्रश्न विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांना पत्र लिहून भरती प्रकरणातील भ्रष्टाचाराची माहिती देणार आहे. तसेच, ही भरती रद्दबातल करण्याची मागणी करणार आहे. असे विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT