Goa Congress Internal Changes Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

Goa Congress Internal Changes: गोव्यातील काँग्रेस पक्षात झालेले बदल हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय असून त्याच्याशी आमचे काहीही देणेघेणे नाही.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी: गोव्यातील काँग्रेस पक्षात झालेले बदल हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय असून त्याच्याशी आमचे काहीही देणेघेणे नाही. गोवा फॉरवर्ड पक्ष हा २०२२ पासून काँग्रेसच्या युतीतील घटक पक्ष होता आणि आजही आहे, असे स्पष्ट मत फातोर्डाचे आमदार तथा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.

काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर युतीसंदर्भात कोणते संकेत देतात, हे स्पष्ट झाल्यानंतरच आम्ही आमच्या पक्षाची भूमिका निश्चितपणे मांडू शकू, असेही त्यांनी सांगितले. चोडणकर यांच्यासोबत काम करण्याचा आम्हाला अनुभव असून त्यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. मात्र, भूतकाळात झालेल्या चुका दोन्ही पक्षांनी मान्य करून त्या सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे माझे मत असल्याचे सरदेसाई यांनी नमूद केले.

आम्ही आमचा जाहीरनामा फातोर्डा मतदारसंघात योग्य पद्धतीने राबविला असून त्यातील अनेक बाबी कार्यान्वित केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पुढील दहा दिवसांत युवा व महिला समित्या सक्रिय

गिरीश चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काँग्रेसची सर्व ४० मतदारसंघांत पक्षबांधणी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्याची आम्ही नोंद घेतली आहे. आमच्या पक्षानेही काही मतदारसंघांमध्ये संघटनात्मक काम सुरू केले आहे. यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आम्ही दहा मतदारसंघांमध्ये गटाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. पुढील दहा दिवसांत त्या मतदारसंघांतील युवा आणि महिला समित्या सक्रिय केल्या जातील, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सिक्स पॅक, मजबूत शरीर... तरीही वयाच्या 35 व्या वर्षी मृत्यू! एका वर्षात 56 बॉडीबिल्डर्सचं निधन; संशोधनातून धक्कादायक खुलासा

Pakistan Cricket: 'ते सवलतीच्या गुणांनीही पास होणार नाहीत', WTC मध्ये पाकिस्तानची लाजिरवाणी अवस्था! आकाश चोप्रानं उडवली खिल्ली; VIDEO व्हायरल

POCO Smartphone Launch: बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स! POCO चा 8000mAh बॅटरी असलेला 5G स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Goa Tribal Employees: गाडी, माडी अन् बायकोची गोल गोल साडी! गोविंद गावडेंचा टोमणा अन् 'उटा'च्या 10 टक्के वर्गणीचा थेट हिशोब

'बससाठी पैसे नाहीत, पण मूल प्रायव्हेट शाळेत जातं', महिलांच्या मोफत बस प्रवास योजनेवरुन मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य; टीकेचा होतोय भडिमार

SCROLL FOR NEXT