मडगाव: मडगाव येथील नामांकित ‘दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स’च्या विद्यार्थी मंडळ निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्षाचा पाठिंबा असलेल्या पॅनलने सर्वच्या सर्व ४ मुख्य जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे.
कृष बाळ्ळीकर यांच्या नेतृत्वाखालील या विजयी पॅनलमध्ये स्वतः बाळ्ळीकर सरचिटणीस म्हणून, अभीर काकोडकर सांस्कृतिक सचिव म्हणून, आरिफ नवार क्रीडा सचिव म्हणून तर डॅनिएला परेरा महिला प्रतिनिधी निवडून आले.
या शानदार विजयाचे स्वागत करताना ‘गोवा फॉरवर्ड’चे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. याप्रसंगी गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस (संघटन) दुर्गादास कामत आणि ‘युवा फॉरवर्ड’ उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष हृतिक मांद्रेकर यांनीही उपस्थित राहून नवनियुक्त प्रतिनिधींचे अभिनंदन केले.
आपल्या सहकारी विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केल्याबद्दल मी कृष आणि त्याच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या विद्यार्थी संघटनेसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आजच्या तरुण पिढीत जबाबदारी स्वीकारण्याची व नेतृत्वाची क्षमता आहे, हेच या निकालाने दाखवून दिले आहे. नवनियुक्त कौन्सिलला यशस्वी कार्यकाळासाठी मनापासून शुभेच्छा.
- विजय सरदेसाई, अध्यक्ष, गोवा फॉरवर्ड
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.