Goa Forward Opposes International Law College in Mayem
पणजी: मयेतील स्थानिक प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत विकास नको! असे ठाम मत व्यक्त करत गोवा फॉरवर्ड पक्षाने मये येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कायदा महाविद्यालयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. हा प्रकल्प जनतेच्या मनाविरुद्ध रेटला जात असल्याचा आरोप पक्षाने केला असून 2.5 लाख चौरस मीटर जमीन लोकांकडून घेऊन खासगी प्रकल्पाला देण्याची तयारी सरकारची आहे, असे सरचिटणीस संतोष कुमार सावंत यांनी स्पष्ट केले.
मयेतील देवस्थान आणि काजू बागायती क्षेत्र असलेल्या जमिनीवर महाविद्यालय उभारण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सरकारने हा विषय ग्रामसभेत मांडला नाही आणि हा प्रकल्प सरकारी नसून खासगी आहे, हे समजल्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामसभेत दोन ठराव संमत करुन या प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय घेतला.
सरकारकडून सांगण्यात आले की, फक्त चार घरे तिथे आहेत. पण प्रत्यक्षात तिथे शाळा, मठ, देवस्थान, स्थानिकांची घरे आणि मंदिरे आहेत. त्यामुळे ही जागा हडप करण्याचा डाव असल्याचा आरोप सावंत यांनी केला.
राजकारणाच्या नावाखाली कायदा महाविद्यालयासारख्या प्रकल्पाला विरोध करणे, हे गावाच्या विकास प्रक्रियेला बाधक ठरतानाच, भावी पिढीचे भविष्य बरबाद करण्यासारखे आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. मयेतील (Mayem) नियोजित आंतरराष्ट्रीय कायदा महाविद्यालय ही काळाची गरज आहे, असे सांगत कायदा महाविद्यालय प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर कडाडताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. सरकारच्या चांगल्या प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांनी मनोवृत्ती बदलावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.