Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : 'इतर पक्षांप्रमाणे सरकारी मालमत्ता विद्रूप करणारे आम्ही नाही', सरदेसाईंनी हाती घेतली मोठी मोहिम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गोवा फॉरवर्ड पक्षाची मोहिम

Rajat Sawant

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गोवा फॉरवर्ड पक्षाने आज ऐतिहासीक वास्तूंना रंगकाम केले. आम्ही इतर राजकीय पक्षांप्रमाणे पक्षीय चिन्हे भिंतींवर रंगवून सरकारी मालमत्ता विद्रूप करत नाही. आम्ही आमच्या ऐतिहासीक वास्तू जतन करण्यासाठी काम करू. इतर मतदारसंघातही अशा ऐतिहासिक वास्तूंचे रंगकाम करुन जतन करावे असे आवाहन गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मडगाव येथील हॉस्पिसीयो रुग्णालय या ऐतिहासीक वास्तूच्या भिंतीचे रंगकाम करण्यास गोवा फॉरवर्ड पक्षाने आज सुरुवात केली. यावेळी गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ते ऐतिहासिक वास्तूंचे रंगकाम करण्यासाठी आल्याने या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

"मडगाव मधील हॉस्पिसीयो रुग्णालयास मोठा ऐतिहासीक इतिहास आहे. गेली तीन वर्षे हे रुग्णालय दुर्लक्षीत आहे. सरकार या रुग्णालयाबाबत निर्णय घेण्यास अपयशी ठरले आहे. सत्ताधारी पक्ष भिंतींवर आपल्या पक्षाचे चिन्ह काढून भिंतीं रंगवत आहे. हे गोव्याचे कल्चर नाही आहे" असे सरदेसाईंनी सांगितले.

सरदेसाई म्हणाले, हे बॅड कल्चर भाजप गोव्यात आणू पाहत आहे. आजपर्यंत मी कधीच फातोर्ड्यात कोणताही पोस्टर, भिंतींवर पक्षाचे चिन्ह न काढता मी तीन वेळा निवडणूक जिंकलो. दिगंबर कामत यांनीही रंगकाम करुन ऐतिहासीक वास्तूंचे जतन करावे. त्यांनी पाठवलेल्या पोलिसांच्या फौजफाट्याला आम्ही घाबरत नाही.

आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून सरकारचे डोळे उघडू पाहत आहोत. राज्यातील इतर मतदारसंघातही लोकांनी हा उपक्रम राबवून ऐतिहासिक वास्तूंचे जतन करावे असे आवाहन गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी केले,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT