Illegal Casino in pernem Dainik Gomantak
गोवा

Illegal Casino In Goa: पेडणेत अवैध कसिनोचं पेव; गोवा फॉरवर्डकडून पोलखोल

शासनाच्या आशीर्वादाने राज्यभरात जुगाराचे अड्डे फोफावत आहेत; विजय सरदेसाई

दैनिक गोमन्तक

पेडणे: गोवा फॉरवर्ड पक्षाने पेडणेमध्ये सुरु असलेल्या अवैध कसिनोचा पर्दाफाश केला आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले की, सरकारच्या आशीर्वादाने गोवा राज्यात जुगाराचे अड्डे सुरु आहेत. राज्यात अवैध कसिनोच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि याला सरकारच जबाबदार आहे.

(Goa Forward exposes illegal casinos in Pernem)

याच पार्श्वभूमीवर मांडवीतील कसिनोंना हरित लवादाने किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकारणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले आहे. मात्र यासाठी कसिनोंकडून आलेले अर्ज हे अर्धवट माहितीचे आणि त्रुटीपूर्ण असल्याने (Goa Coastal Zone Management Authority) ‘जीसीझेडएमए’ ने या अर्जांवर असमाधान व्यक्त केले आहे.

'GCZMA'ला कॅसिनोंकडून आलेले अर्ज अपूर्णावस्थेत!

‘एनजीटी’च्या निर्देशांनुसार मांडवीत चालणाऱ्या कसिनोंना 12 सागरी मैलांपर्यंतच्या सीआरझेडसाठी ना हरकत दाखला घेणे आवश्यक आहे. प्राप्त झालेले अर्ज अपूर्ण आणि कागदपत्रांची पूर्तता नसलेले आहेत.

प्राधिकरणाच्या आदेशाला आव्हान

आरटीआय कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी कसिनो नदीच्या 12 सागरी मैलाच्या आत सीआरझेड- 4 अंतर्गत येणाऱ्या भागात हलवण्यात आली असल्याचे एनजीटीने नजरेस आणून दिले होते. हा युक्तीवाद एनजीटीने मान्य करून शेट्ये यांची याचिका दाखल केली होती.

तसेच इतर खात्यांकडून आवश्‍यक असलेले ना हरकत दाखले आणि जहाज तपशील सादर करण्याची सूचना अर्जदारांना प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. सर्व दस्तावेज सार केल्यानंतरच अर्जांची प्रक्रिया पूर्ण करता येईल, असा निर्णय जीसीझेडएमएचया गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता.

कसिनोकडून सीआरझेडसाठी ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने कारभार थांबवण्याचा आदेश ‘एनजीटी’ने दिला होता. तसेच गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला कसिनोंमुळे झालेल्या पर्यावरणाच्या नुकसानीचे मूल्यांकन आणि भरपाई करण्यासही आदेशात स्पष्ट केले होते.वसूल केलेल्या निधीतून कृती आराखडा तयार करून पर्यावरण पुनर्संचयित करण्यासाठी वापरण्यात करण्याचे नमूद केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT