Electricity Problem | Power Cut Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity Problem: आयोगाला सादर केलेल्या आकडेवारीमध्ये फेरफार; गोवा फॉरवर्डचा आरोप

Goa Electricity Problem: प्रभुदेसाई : मडगावात वीज खात्यातर्फे जनसुनावणी; सौरऊर्जा वापरण्याचे आवाहन

दैनिक गोमन्तक

Goa Electricity Problem: वीज खात्याने संयुक्त वीज नियामक आयोगाला सादर केलेल्या आकडेवारीत फेरफार केल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष तथा वीज खात्यातील निवृत्त कनिष्ठ अभियंता दिलीप प्रभुदेसाई यांनी मडगावात जनसुनावणीवेळी केला. यावेळी आयोगाचे अध्यक्ष आलोक टंडन आणि सदस्य (कायदा) ज्योती प्रसाद उपस्थित होत्या.

दिलीप प्रभुदेसाई म्हणाले की, वीज उपकेंद्रापासून ग्राहकापर्यंत पोहचविताना जी नुकसानी होत आहे, ती २२-२३ सालात ७.४१ टक्के दाखविली आहे. २३-२४ सालच्या पहिल्या सहामाहीसाठी ८.३७ टक्के तर दुसऱ्या सहामाहीसाठी ६.०४ टक्के एवढी कमी दाखविली आहे. हा फेरफार जर एकाच विषयासंदर्भात दिसून आला तर संपूर्ण सादरीकरणात असे अनेक फेरफार सापडू शकतील, असा दावाही प्रभुदेसाई यांनी केला.

गोव्यासारख्या लहान प्रदेशासाठी हे नुकसान ५ टक्के पूरक आहे. तरीसुद्धा आकडा ६ टक्क्यांवर आणला, तर वीज खात्याचा ४६ कोटींचा खर्च कमी होऊ शकतो. त्यामुळे ८४ कोटींचे जे प्रस्तावित नुकसान दाखविले आहे, ते कमी होईल. त्याचप्रमाणे जर १५० कोटींची थकबाकी वसूल केली तर सामान्य नागरिकांसाठी जी १५ पैशांची दरवाढ दाखविली आहे, ती सध्याच्या दरापेक्षा १५ पैशांनी कमी करता येणे शक्य आहे, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.

सरकार दरवर्षी वीज क्षेत्रातील साधनसुविधांसाठी १,८०० कोटी रुपये खर्च करते. आतापर्यंत सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्च केल्याचे सरकार सांगते, मग एवढा पैसा गेला कुठे, असा प्रश्र्नही प्रभुदेसाई यांनी आज उपस्थित केला.

प्रभुदेसाई म्हणाले की, यापूर्वी दोनदा प्रस्तावित दरवाढ केलेली नाही. एकदा कोविडचे कारण देऊन व दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुका झाल्या म्हणून. आता आयोगाने दरवाढ प्रस्तावित केली तरी यावेळीही ती केली जाणार नाही. कारण आगामी लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. आज ज्या ज्या ग्राहकांनी आपली मते मांडली, त्यात सर्वांचाच वीज दरवाढीला विरोध केला. ही दरवाढ टाळण्यासाठी काय उपाययोजना होऊ शकते, हेही त्यांनी सांगितले.

ज्युडिथ आल्मेदा म्हणाल्या की, यापूर्वीही आयोगासमोर आम्ही आमच्या अडचणी व समस्या मांडल्या होत्या; पण त्यांची दखल घेतली गेली नाही. मिरांडा म्हणाल्या की, राज्यात वीजपुरवठा सुरळीत होत नाही. कमी दाबामुळे विद्युत उपकरणे बिघडतात.

मार्टिन रॉड्रिग्स यांनी सांगितले की, जी थकबाकी आहे ती प्रथम वसूल करा. तसेच वीज अभियंत्यांनी केवळ आपल्या कचेरीत न बसता साईटवर जाऊन प्रत्यक्ष समस्या काय आहेत त्या जाणून घ्याव्यात. सिल्वेस्टर नियासो, जॅक मार्गेलो, दीपक, गोवा कॅनच्या लॉर्ना फर्नांडिस यांनीही आयोगासमोर समस्या मांडल्या.

वीज चोरी निदर्शनास आणून द्या!

वीज खात्याचे मुख्य कार्यकारी अभियंते स्टिफन फर्नांडिस म्हणाले की, जर कोणी वीज चोरी प्रकरणात गुंतले असतील, तर अशी प्रकरणे निदर्शनास आणून द्या, त्यावर कारवाई केली जाईल. दिलीप प्रभुदेसाई यांनी मांडलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना ते म्हणाले की, आरोप करताना त्या माणसाने स्वत: सर्व माहिती जाणून घेणे गरजेचे असते. मी एक जबाबदार अधिकारी आहे. चुकीची माहिती कधीही देऊ शकत नाही. दरवाढ व थकबाकी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आयोगाला केलेल्या सूचना

वीजीचोरीवर अंकुश ठेवावा.

हॉटेल, औद्योगिक आस्थापनांना वीजनिर्मिती करण्यासाठी, तसेच सौरऊर्जा वापरासाठी प्रोत्साहीत करावे.

जे क्षमतेपेक्षा जास्त वीज वापरतात त्यांच्यावर कारवाई करावी.

काही व्यावसायिक घरगुती दराच्या मीटरवर व्यवसाय चालवितात, त्यांना दंड करावा.

खात्याने वीजपुरवठ्याचे ऑडिट करावे.

दोषपूर्ण ट्रान्सफॉर्मर, वाहिन्या व इतर उपकरणे बदलावीत.

भूमिगत वीजवाहिन्या घातल्यानंतर त्यांची नियमितपणे देखभाल करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT